एक्स्प्लोर

वैयक्तिक माहिती चोरणाऱ्या कंपन्यांना दणका, सुरक्षितता विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून आता वैयक्तिक माहितीची चोरी केल्यास कंपन्यांवर कारवाई होणार आहे. विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत वैयक्तिक माहिती सुरक्षितता विधेयकालाही आज मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच हे बिलही संसदेत मंजुरीसाठी मांडण्यात येईल. या विधेयकामुळे डेटा चोरी करणाऱ्या कंपन्यांना दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने वैयक्तिक माहिती सुरक्षितता विधेयकाला बुधवारी मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून आता वैयक्तिक माहितीची चोरी केल्यास कंपन्यांवर कारवाई होणार आहे. जावडेकरांनी सांगितलं की, हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल. या विधेयकात वैयक्तिक माहिती मिळवणे, त्या माहितीचा साठा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. याचबरोबर या विधेयकासंदर्भात दंड, आचारसंहिता आणि विधेयक लागू करण्याबाबत एक मॉडेल बनविण्यात येणार आहे. मागील आठवड्यात माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक आणले जाणार असल्याबाबत माहिती दिली होती. भारतात ठेवावा लागणार सर्व्हर विधेयकामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे सर्व्हर. या विधेयकामध्ये प्रस्तावित केलं आहे की, प्रत्येक ग्लोबल कंपनीला भारतात देखील एक डेटा बँक अर्थात एक सर्व्हर तयार करणे अनिवार्य असेल. याचा उद्देश असा की, माहितीची जगात कुठेही चोरी झाली तरी भारतातील लोकांना याचा फटका बसणार नाही. मागील वर्षी अशाच एका प्रकरणात फेसबुकच्या माध्यमातून जवळपास पाच लाख भारतीयांची वैयक्तिक माहिती कॅम्ब्रिज अॅनलिटिकाला दिल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. हे देखील वाचा -  नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेचा विरोध, भाजप सरकारची राज्यसभेत कसोटी दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देखील सरकारने मंजुरीसाठी आणले आहे. हे विधेयक लोकसभेत मंजुर होण्याची शाश्वती असली तरी राज्यसभेत सरकारची कसोटी आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातल्या हिंदू बौद्ध जैन निर्वासितांना भारताचा नागरिक बहाल करणारे हे विधेयक आहे. या विधेयकावरून ईशान्य भारतात मोठा गदारोळ सुरू आहे. या विधेयकात शेजारी देशांमुळे आश्रयासाठी आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ईसाई समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. एनडीएचा विरोधक बनलेल्या शिवसेनेने या विधेयकाला विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे. हे विधेयक भारतीय राज्यघटनेच्या तत्वांच्या विरोधात असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. नागरिकांमध्ये त्यांच्या श्रद्धेच्या आधारे भेद केला जाऊ शकत नाही, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Virat Kohli On Nana Patekar: नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget