Parinay Fuke On Manoj Jarange: मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हातात, भाजपच्या परिणय फुकेंचा हल्लाबोल; म्हणाले.....
Parinay Fuke : मनोज जरांगे यांचा रिमोट हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हाती आहे. शरद पवार जितके चाबी भरणार तितके मनोज जरांगे बोलतात, असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके यांनी केला आहे.

Parinay Fuke On Manoj Jarange पावसाळा आला कि ज्याप्रकारे बेडकं बाहेर निघतात तसे निवडणूक आली कि मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) बाहेर निघतात. जरांगे यांची विश्वसनीयता संपली आहे. गोवा येथे ओबीसी अधिवेशनाला घेऊन जरांगे यांनी केलेले आरोपात काही तथ्य नाही. शिवाय मनोज जरांगे यांचा रिमोट हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हाती आहे. शरद पवार जितके चाबी भरणार तितके मनोज जरांगे बोलतात, असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला. यावर प्रत्युत्तर देत भाजपच्या परिणय फुकेंनी हल्लाबोल केलाय. ते नागपूर येथे बोलत होते.
मराठ्यांना आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच- परिणय फुके
मनोज जरांगे फडणवीसांवर आरोप करतात, मात्र मराठ्यांना आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कदाचित मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे जरांगे यांना वाटत असावे. कदाचित मनोज जरांगे यांना मराठा व इतर समाजात तेढ निर्माण करायचा असावा, अशी शंका हि परिणय फुके यांनी व्यक्त केली.
दूध संघाच्या मेळाव्याला शिंदे सेनेच्या आमदाराची गैरहजेरी; आमदार फुके उपस्थित
'शिवसेनेचा बाप मीचं' असं वादग्रस्त विधान केल्यानं भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर चौफेर टीका झाली होती. राज्यभरात याचे पडसाद उमटल्यानंतर पहिल्यांदाच आमदार फुके हे भंडाऱ्यात आलेत. महायुतीच्या ताब्यात असलेल्या भंडारा जिल्हा दूध संघाच्या मेळाव्याला भाजप आमदार फुके आणि शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे दोघेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार परीणय फुके आवर्जून उपस्थित होते. मात्र, शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची अनुपस्थिती सर्वांना खटकली.
वादग्रस्त विधानानंतर फुके आणि भोंडेकर दोघेही या कार्यक्रमाला एकाचं मंचावर येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतं होती. मात्र, भोंडेकर यांनी कार्यक्रमाला पाठ दाखविल्यानं अजूनही त्यांच्या मनातून फुकेंच्या बाबतीतली मळमळ निघाली नाही, हेचं यावरून लक्षात येतं. भविष्यात भंडाऱ्यात भाजप आणि शिंदे सेनेत आणखी दरी वाढणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















