एक्स्प्लोर

पुण्यात कामाला, परीक्षेसाठी परभणीत, कोठडीत जीव गमावेलेला सोमनाथ सूर्यवंशी कोण होता? जाणून घ्या A टू Z माहिती

परभणीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे.

परभणी : संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याचा दाव्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उफाळला. समस्त आंबेडकरी संघटना, आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचाराप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi Death) या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता. मात्र आता शवविच्छेदनाच्या अहवालातून Shock following multiple injuries हे कारण समोर आल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. विरोधी पक्षाचे नेते पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतायत. असे असतानाच आथा सोमनाथ सूर्यवंशी हा तरूण नेमका कोण आहे? असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे या तरुणाबद्दल जाणून घेऊ या... 

शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे?

न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचे छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाची सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे. याच शवविच्छेदनातून सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. सुरुवातीला सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असाताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, असा दावा करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार सूर्यवंशीच्या मृत्यूचे कारण हे Shock following multiple injuries असे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सूर्यवंशीचा मृत्यू मार लागल्याच्या धक्क्यातून झाल्याचे शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे. 

परीक्षा देण्यासाठी आला होता परभणी शहरात 

सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता. त्याने परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला होता. सध्या त्याच परीक्षा चालू होती. त्यामुळेच तो पुण्यातून परभणीत आला होता. मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा एएलबीच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. तर सोमनाथ शूर्यवंशीच्या आधार कार्डवरील माहितीनुसार तो मूळचा पुण्याचा रहिवासी होता. त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते. त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता. तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायचा. 

प्रकाश आंबेडकर परभणीत दाखल

दरम्यान, सोमनाथच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी बाकावरील पक्षांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याची भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकर स्वत: परभणीत दाखल झाले आहेत.   

हेही वाचा :

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्काराला थांबणार; पोलिसांच्या कारवाईवर संशय, म्हणाले..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोलेChitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणाVidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Embed widget