एक्स्प्लोर

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्काराला थांबणार; पोलिसांच्या कारवाईवर संशय, म्हणाले..

Prakash Ambedkar: परभणी हिंसाचार प्रकरणी (Parbhani Violance) न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण 'शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज' असे देण्यात आले आहे.

Prakash Ambedkar: परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) याचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर राजकीय घटनांना वेग आला आहे. शवविच्छेदनानंतरचा मृत्यूचे कारण सांगणारा प्राथमिक अहवालही समोर आल्यानंतर सोमनाथचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरमधून परभणीत आणला जात आहे. दरम्यान, परभणीत मृतदेह आणून अंत्यविधी होईपर्यंत मी थांबणार असल्याचं वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत. पोलिसांच्या कारवाईवर संशय घेत त्यांनी परभणीत संविधानाची विटंबना का करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं वक्तव्य केलंय. पोलिसांनी केलेली कारवाई ही समजून होती का हेही कळत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. तसेच बीड मधील परिस्थिती स्टंट असून हा स्टंट भीतीदायक असल्याचंही ते म्हणाले. 

परभणी हिंसाचार प्रकरणी (Parbhani Violance) न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण 'शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज' असे देण्यात आले आहे. यावरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता असून परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, परभणीत पोलिसांनी जे ॲक्शन घेतली ती कोऑर्डिनेटेड होती की नव्हती हे कळत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. इथले  IG जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. याचा तपास आम्ही करणारच असेही ते म्हणाले.

फॉरेन्सिक विभाग असेल तिथेच उत्तरीय तपासणी करावी: प्रकाश आंबेडकर 

सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यूप्रकरणी उत्तरीय तपासणी ही फॉरेनसिक विभाग असेल तर तिथेच करावी अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आलेल्या सर्व विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मल्टिपल इंजुरीज असल्याने मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. शासनाला मी सांगतोय अपघाती व्यक्तींच्या मृतदेहाचे सिटीस्कॅन करावे. असेही आंबेडकर म्हणाले. मृतदेह परभणीत येतोय अंत्यविधी होईपर्यंत मी थांबणार. शांततेत हे सगळं पार पडलं पाहिजे. असंही ते म्हणाले.

कॉम्बिंग ऑपरेशनच्या काही तासात पोलिसांकडून जी घरे फोडण्यात आली त्यावर कारवाई करावी. पुतळ्याच्या आसपास लाठी चार्ज केला गेला तो पोलिसांनी केला की पोलिसांच्या वेशातील दुसऱ्या कोणी केला हे शोधणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ज्यांना ज्यांना मारले आहे त्यांच्या केसेस जिल्हा न्यायालयात दाखल करण्याच्या सर्व वकिलांना सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा:

Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget