एक्स्प्लोर

परभणीकरांना दिलासा! पुर्णा, गाेदावरी, दुधना खळाळल्या, दोन दिवसांच्या पावसाने निम्न दुधनासह येलदरीतही पाणी वाढलं..

एकीकडे पुणे, नाशिकमध्ये नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. परभणीतही नद्या खळाळू लागल्यात.

Parbhani: राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पावसाचा जोर वाढला असून नदी नाले ओढे तुडुंब भरले असून गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसानं धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. एकीकडे पुणे, नाशिकमध्ये नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अनेक धरणांमधून विसर्ग होत आहे. दरम्यान मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे परभणीतील निम्न दुधना धरणात 5.15 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरणात दोन टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. 

परभणी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दांडी मारली खरी पण मागच्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाच्या हजेरीमुळे जिल्ह्यातील एकूण चित्रच बदललं  आहे. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने परभणीतील पूर्णा, गोदावरी, दुधना नद्या खळलल्याच चित्र आहे.  

निम्न दुधनासह येलदरीतही पाणीसाठा वाढला

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार परभणीतील सर्वाधिक क्षमतेच्या निम्न दुधना  धरणात आज 20.15% पाणीसाठा झालाय. मागील वर्षाच्या तुलनेत साधारणतः सहा टक्क्यांची तूट या धरणात दिसून येत आहे. मागच्या वर्षी निम्न दुधना धरण 26.92 टक्क्यांनी भरलं होतं. यंदा अवघ्या दोन दिवसांच्या पावसावर थेट सव्वा पाच टक्क्यांनी धरणसाठ्यात वाढ झाली आहे. निम्न दुधना सह हिंगोली जिल्ह्यात असणारे येलदरी धरणावर परभणी जिल्ह्याची तहान भागते. 

मागील दोन दिवसात झालेल्या दमदार पावसाच्या हजेरीनंतर हिंगोलीतील येलदरी धरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे. येलदरी धरणात मागील वर्षी 59.92% पाणी होतं. आज या धरणात 38.50% उपयुक्त जलसाठा आहे. 

परभणी जिल्ह्याला मोठा दिलासा 

मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याने परभणी जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय. काही भागात पिकांमध्ये पाणी साठल्याने कापूस आणि सोयाबीन मध्ये नुकसानाची शक्यता आहे. शहरातील नदी नाले ओढे प्रवाहित झाले आहेत. यंदा खरीप पेरण्यांनंतर शेतकऱ्यांना पिकांना पाणी मिळतंय की नाही याची धाकधूक होती. मात्र, आता दोन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय.

मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता 

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिलेले अंदाजानुसार मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस राहणार आहे. परभणीत पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा:

 पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget