एक्स्प्लोर

Palghar Rain Updates : अखेर 15 तासांनी सुखरुप सुटका; पालघरमधील वैतरणेच्या पुरातून 10 कामगारांना वाचवलं

Palghar Rain Updates : पालघरमधील वैतरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 10 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. तब्बल 15 तासांनी या कामगारांची सुटका करण्यात आली.

Palghar Rain Updates : पालघरमध्ये (Palghar) वैतरणा नदीला अचनाक आलेल्या पुरामुळे 10 कामगार अडकून पडले होते. यासर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुंबई-बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आल्यानं कामगार अडकले होते. अखेर तब्बल 15 तासांनी सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच काल (बुधवारी) पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात काही कामगार अडकले होते. मुंबई-बडोदा महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम सुरु होतं. यावेळी पावसाचा जोर वाढू लागल्यानं वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा कामगारांना अंदाज न आल्यानं ते आडकून पडले आहेत. हे सर्व कामगार गेल्या 15 तासांपासून अडकून पडले होते. वैतरणा नदी पात्रात अडकलेल्या 10 कामगारांची 15 तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आलं आहे. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. एनडीआरएफची टीमही दाखल झाली आहे. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आलं होतं. आधी 6 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं, त्यापाठोपाठ उर्वरित कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं. 

पाहा व्हिडीओ : Palghar Vaitarna River नदीत अडकलेल्या 10 कामगारांची सुटका, NDRF जवानांना मोठं यश

तीन दिवस पालघरला 'रेड अलर्ट'

पुढील तीन दिवसांसाठी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यातील काही ठिकाणी पूरस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. 

भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे दुर्गम भागातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजल्यानंतर घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. अत्यवस्थ परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut FULL  PC : शिंदेंनी बेळगावात जाऊन कधीही सीमावासियांची गाऱ्हाणी ऐकली नाहीतBhaskar Jadhav  MVA : पुरेसं संख्याबळ नसलेल्या विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार?CM Devendra Fadanavis : कोपर्डीतील पिडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी; दिलेला शब्द पाळला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
Embed widget