दिव्यांगाच्या डब्यातून बेकायदेशीर प्रवास, खाली उतरवताच प्रवाशानं RPF जवानाच्या हाताचा घेतला चावा
वसई रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रवाशाने आरपीएफ जवानाच्या हाताला चावा घेतला आहे.
Vasai News : वसई रेल्वे स्थानकावर (Vasai railway station) एका प्रवाशाने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रवाशाने आरपीएफ जवानाच्या हाताला चावा घेतला आहे. ही घटना काल म्हणजेच 12 जानेवारी 2025 रोजी घडली आहे. या घटनेनंतर तातडीने संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरपीएफने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका कसा घडला प्रकार?
डहाणूहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील दिव्यांग डब्यात संबंधित प्रवासी बेकायदेशीरपणे प्रवास करत होता. आरपीएफ जवानाने त्याला डब्याबाहेर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशाने त्याला विरोध करत वाद घातला आणि संतापाच्या भरात जवानाच्या हाताचा चावा घेतला. या घटनेनंतर तातडीने संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरपीएफने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्या प्रवाशाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मागील दोनच दिवसापूर्वी पुण्यातही भररस्त्यात पोलिसाला मारहाण
मागील दोनच दिवसापूर्वी पुण्यात देखील असाच काहीसा प्रकार घडला होता. पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका युवकानं भररस्त्यात पोलिसाला मारहाण केली होती. या युवकानं प्रचंड नशा केली होती. स्थानिकांनी या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा नशेत होता. हा युवक मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला तो मारहाण करत होता. तसेच रस्त्यावरुन जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारत होता. दरम्यान, या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हाटकले. यावेळी राग अनावर झाल्यानं त्या तरुणाने थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यानंतर जमावाने या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक तसेच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी आरोपीला ताब्यात देखील घेतलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी मानसिक आजारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. हडपसर पोलिसा ठाण्यात या आरोपीविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
महत्वाच्या बातम्या: