नवरात्रीत 'गरबा' खेळताना 45 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; वैद्यकीय तज्ज्ञांकडून मोलाचा सल्ला
Palghar Vasai News : वसईत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी गरबा खेळत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Palghar Vasai News : वसईत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी गरबा खेळत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमनगर परिसरातील विघ्नेश्वर मंडळाच्या नवरात्री उत्सवात बुधवारी 23 सप्टेंबरला सहभागी झालेल्या फाल्गुनी राजेश (वय 45) या महिलेने गरबा खेळून झाल्यानंतर अस्वस्थ वाटताच त्या बसल्या. अचानक त्यांचा तोल जाऊन त्या कोसळल्या. मंडळातील कार्यकर्त्यांनी तत्काळ धावपळ करून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
संपूर्ण परिसरात शोककळा पसरली
नवरात्रीच्या जल्लोषात ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सणासुदीच्या उत्साहात बेभान होऊन नाचल्याने हृदयावर ताण येऊ शकतो. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा धोका असलेल्या नागरिकांनी आधी आरोग्य तपासणी करूनच अशा कार्यक्रमात सहभाग घ्यावा. तसेच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नवरात्री उत्सवांमध्ये आयोजकांनी ठिकाणी तातडीची वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांची उपलब्धता ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:


















