Palghar News : धक्कादायक! नदीपात्रात मासेमारीसाठी गेला अन् शार्क माशाने लचके तोडले
Palghar News : वैतरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे शार्क माशाने (Shark fish) लचके तोडले आहेत. मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात महाकाय शार्क मासा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विकी गोवारी (वय 32) असे शार्क माशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Palghar News : वैतरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे शार्क माशाने (Shark fish) लचके तोडले आहेत. मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात महाकाय शार्क मासा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विकी गोवारी (वय 32) असे शार्क माशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.13) दुपारच्या सुमारास घडली.
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
वैतरणा नदी पात्रात 200 किलोहून अधिक वजनाचा महाकाय शार्क मासा आढळून आल्याने स्थानिक नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. 32 वर्षीय तरुणाला शार्कने जखमी केले असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शार्क माशाने त्याच्या चावा घेतल्याने त्याच्या पायाचा तुकडाच पडलाय. जखमी तरुणावर दादरा नगर हवेलीतील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शार्क माशाला पडकण्यात स्थानिकांना यश
महाकाय शार्क मासा आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, शार्क माशाला पकडण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. त्यामुळे सध्या शार्कची दहशत कमी झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातही असाच काही धक्कादायक प्रकार घडलाय. पुण्याचा आसपासच्या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. बिबट्यांची तस्करी झाल्याचे प्रकार उघडकीस येत असतात. त्याची चर्चाही सुरु असते. असाच काहीसा प्रकार पुण्यात 11 फेब्रुवारी रोजी घडला होता. हवेली तालुक्यातील मौजे वडगावमध्ये हा प्रकार घडला. बिबट्याच्या गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांनी चक्क मृत असलेल्या बिबट्याचा पंजाच कापला. या प्रकरणी वन विभागाकडून अल्पवयीन मुलांवर गु्न्हा दाखल करण्यात आला होता.
कापलेला पंजा आढळून आल्याने वन अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यानी थेट घटनास्थळ गाठले. श्वान पथकाच्या साहाय्याने या प्रकरणाचा तपास करण्यात आला. शिवाय, उसतोड कामगारांची मदत घेण्याचे वनधिकाऱ्यांनी ठरविले. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
शेवटी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी करण्याचे ठरवले. या प्रकरणाची त्यांना एका अल्पवयीन मुलाकडून माहिती दिली. आपल्या वडिलांच्या आणि सोबतच्या 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे 3 नखे आणि पायाचा पंजा व त्याचे 1 नख अशी एकूण 4 नखे कोयता आणि सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवले असल्याचे त्याने सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
PM Narendra Modi : अबूधाबीतील मंदिराच्या प्रस्तावासाठी क्षणार्धात होकार, भारत -युएई दोस्ती जिंदाबाद; पीएम मोदींची अबूधाबीतून घोषणाबाजी