Palghar News : पालघरमधील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे फेसाळले, पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळं पालघरमधील धबधबे फेसाळले आहेत.
Palghar News : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही ठिकाणी तर नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अशातच पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळं पालघरमधील धबधबे फेसाळले आहेत. पालघरमधील जव्हार हे ठिकाण मिनी महाबळेश्वर समजलं जातं. पावसाळा सुरु झाला की येथील वातावरण रमनीय बनते. जव्हार भागातील हे एक पर्यटन स्थळ आहे. हा अति दुर्गम भाग असला तरीही येथील दाभोसा आणि हिरडपाडा धबधबे मनमोहक आहेत. तालुका अतिदुर्गम असला तरी निसर्गाच्या कुशीत वसलेले हे धबधबे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहेत.
जव्हार तालुक्यापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत दाभोसा आणि हिरडपाडा हे धबधबे आहेत. धबधब्याची उंची किमान 300 फुट आहे. या धबधब्याच्या ठिकाणी सध्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई तसेच गुजरात, नाशिक आणि सिलवासा मधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्यावर येत आहेत. या धबधब्याच वैशिष्ठ म्हणजे हा धबधबा बाराही महीने सुरु असल्यानं पावसाळा नसतानाही पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो. मात्र वर्षा ऋतुत धबधब्या बाजूला असलेल्या हिरवाईमुळे या दोन्ही धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलुन दिसते. यामुळे पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येताना पहायला मिळतात.
दाट धुकं आणि कोसळणारे धबधबे हे इथलं वैशिष्ट्य. नजर जाईल तिथे हिरवाईच हिरवाई दिसत असल्यानं बाराही महीने वातावरण प्रसन्न असतं. दाभोसा आणि हिरडपाडा या धबधब्यात जेवढ्या वेगाने आणि उंचीवरुन हे पाणी खाली पडते तितक्याच वेगाने त्याचे तुषार 50 ते 60 फुटांपर्यंत वर उडतात. चारही बाजुने डोंगरदऱ्यांनी वेढलेला परिसर, सर्वत्र जंगल आणि नीरव शांतता तसेच धबधब्यातुन पडणाऱ्या पाण्याचा खळखळाट हे दृष्य खुप मनमोहक आणि विलोभनीय दिसते. त्यामुळं पर्यटकांकडून वेगळच समाधान व्यक्त केल जात.
महत्वाच्या बातम्या: