एक्स्प्लोर

Palghar : पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर 50 हजारांची लाच घेताना अटक, जमीन प्रकरण अंगलट

Palghar Bribe News : पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना मुंबई लाचलुचपत विभागाने 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं.

पालघर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर हे एका जमीन प्रकरणात 50 हजार रुपयाची लाच घेताना सापडले आहेत. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं. त्यांना अटकही करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी संजीव जाधवर यांची बदली झाली असतानाही त्यांनी पदभार सोडला नव्हता. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांना अटक केली. पालघरमधून संजीव जाधवर यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर येथे झाली होती. मात्र एक वर्ष वाढवून मिळावे ह्यासाठी ते प्रयत्नशील होते.

जमीन प्रकरणात अडकले

वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे 50 हजाराची लाच मागितली होती.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर संजीव जाधवर आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. 

या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ मजली असून या प्रकरणात अजून कोण सहभागी आहेत का हे तपासले जाण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती

व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..

Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला

व्हिडीओ

Black Magic Kolhapur : 'निवडणुकीत भोंदूगिरी वाढते, बळी पडू नका', अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
Delhi Blast Update : दिल्ली स्फोटात नवा खुलासा, फरिदाबादमध्ये २५०० किलोहून अधिक स्फोटकं जप्त
Local Body Elections : 5 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : Superfast News : 12 NOV 2025 : ABP Majha
Delhi Blast Probe: दिल्ली पोलिसांकडून लाल रंगाच्या Ford EcoSport चा शोध, पाच पथकं तपासात.
TOP 50 Superfast News : बातम्यांचं अर्धशतक : 12 NOV 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'

शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट

इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक

Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
Embed widget