Farmers Agritation : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पालघर-मनोर मार्गावर कुणबी सेनेचा रास्ता रोको, मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग
शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रलंबित मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या (Kunabi Sena) नेतृत्वाखाली पालघर-मनोर मार्गावर (Palghar-Manor Road) चहाडे नाका इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
Palghar Farmers Agritation : शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रलंबित मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या (Kunabi Sena) नेतृत्वाखाली पालघर-मनोर मार्गावर (Palghar-Manor Road) चहाडे नाका इथे रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं पालघर (Palghar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या तासाभरापासून हे रास्ता रोको आंदोलन सुरु असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Palghar Agritation : 'या' मागण्यांसाठी आंदोलन सुरु
शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रश्नावरुन कुणबी सेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या तासभरापासून पालघर-मनोर मार्गावर आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणी नोंद करण्यात यावी. आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीस मुदत वाढ मिळावी, भात खरेदी केंद्रांवर होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशा विविध आठ मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनात काही शेतकरी बैलगाडी घेऊन दाखल झाले
देशाचा पोशिंदा असणाऱ्या आमच्या समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार झालाच पाहिजे. भाताला बोनस मिळालाच पाहिजे अशा मागण्यांचे फलक कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या हातात आहेत. या आंदोलनात काही शेतकरी बैलगाडी घेऊन दाखल झाले आहेत. यावेळी शेतकरी घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, पालघर-मनोर मार्गावर चहाडे नाका इथे रास्ता रोको केल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे, वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
भात खरेदी योजनेला मुदतवाढ मिळावी
शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन न केल्यानं तसेच पीक पेरा सातबारा नसल्यानं अनेक शेतकऱ्यांना भाताची विक्री करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं भात खरेदी करण्यास मुदत वाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत आहे. ही लूट थांबावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Success Story : धुळ्याची केळी इराणच्या बाजारात, नोकरी सांभाळून केळीचा यशस्वी प्रयोग; वाचा सत्यपाल गुजरांची यशोगाथा