Shah Rukh Khan : पाकिस्तानात कलाकारांकडून 'किंग खान'ला अनोखी भेट; साकारलं हुबेहूब प्रतिमेचं सँड पोर्ट्रेट
SRK Sand Portrait In Pakistan Beach : पाकिस्तानमधील एका वाळू कलाकाराने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची वाळूतील कलाकृती तयार केली आहे.
SRK Sand Portrait In Pakistan Beach : बॉलिवूडच्या दिग्गज सुपरस्टारमध्ये बादशाह म्हणजेच शाहरूख खानचं (Shah Rukh Khan) नाव टॉपवर आहे. शाहरूख खानचा चाहता वर्ग फक्त भारतातच (India) नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. इतकंच नाही तर, भारताच्या शेजारील देश पाकिस्तानातही (Pakistan) किंग खानच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. अशाच पाकिस्तानच्या प्रसिद्ध एका वाळू शिल्परकाराने गडानी बीचवर शाहरुख खानचे अप्रतिम पोर्ट्रेट बनवले आहे. या पोट्रेटची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
पाकिस्तानच्या बीचवर शाहरुख खानचं सँड आर्ट
शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाहरुख खानचा असाच एक चाहता पाकिस्तानचा सँड आर्टिस्ट समीर शौकत आहे. खरंतर, नुकतेच समीर शौकतने बलुचिस्तानमधील प्रसिद्ध गडानी समुद्रकिनारी वाळूवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे स्केच कोरले आहे. समीर आणि त्याच्या टीममधील सहकाऱ्यांनी शाहरुख खानचे हे अप्रतिम वाळूचे पोर्ट्रेट साकारले आहे याचा अंदाज आपल्याला या पोट्रेटकडे पाहताक्षणीच येतो.
किंग खानच्या या पोर्ट्रेटच्या खाली SRK लिहिण्यात आले आहे. समीर शौकत हा पाकिस्तानचा प्रसिद्ध सॅंड आर्टिस्ट आहे. तो राशिदी आर्टिस्ट ग्रुपचा देखील एक भाग आहे. विशेष म्हणजे समीर हा शाहरुख खानचाही मोठा चाहता आहे. याचा अंदाज किंग खानच्या या सँड आर्टवरून सहज लावता येतो.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
समीर शौकतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शाहरुख खानच्या या सँड आर्ट पोर्ट्रेटचा फोटो शेअर केला आहे. या कॅप्शनमध्ये समीरने लिहिले आहे की- 'मी आणि माझ्या टीमने शाहरुख खानचे सर्वात मोठे सँड स्केच बनवले आहे. एक चाहता म्हणून त्याच्यासाठी आमची ही भेट आहे.' शाहरुख खानचे हे सँड स्केचचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. समीरने शेअर केलेल्या किंग खानच्या या फोटोंना चाहतेही प्रचंड लाईक आणि कमेंट्स करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :