एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: शाहबाज शरीफ यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हातातलं खेळणं बनवणारा असीम मुनीर कोण?

Pahalgam Terror Attack: सध्या भारतानं पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानात एक वेगळच चित्र आहे.

Pahalgam Terror Attack: सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारतानं (India vs Pakistan War) आता आणखी एक पाऊल उचललं आहे. जम्मू काश्मीरमधल्या चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणाचे दरवाजे भारताने बंद केले. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या चिनाब नदीची पाणीपातळी कमालीची खाली गेली आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाबचा मोठा भाग चिनाबवर अवलंबून आहे. त्यामुळे भारताच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान मेटाकुटीला येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफची खुर्चीच धोक्याच असल्याचं दिसून येत आहे. 

सध्या भारतानं पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानात एक वेगळच चित्र आहे. कारण पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर परवेझ मुशर्रफच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय. आणि त्यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफची (Shehbaz Sharif) खुर्चीच धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. हा असीम मुनीर परवेझ नेमका कोण आहे?, याची चर्चा सध्या रंगली आहे.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांचाच कित्ता गिरवत असल्याचं सध्या दिसून येतंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर मात्र पाकमध्ये चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसतोय. मुनीरचे हे सगळे कारनामे पाहता तो मुशर्रफ पार्ट टूची तयारी करतोय, असं बोललं जातंय. नोव्हेंबर २०२२ मध्ये असीम मुनीरकडे पाकिस्तानच्या लष्कराची कमान सोपवण्यात आली. तीही मुनीरच्या निवृत्तीच्या दोन महिने आधी. पाकिस्तानातील अनेकांसाठी हा खरं तर धक्का होता. पण माजी पंतप्रधान इमरान खान यांच्याशी असलेल्या राजकीय वैमनस्यातून शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी सेनेची सूत्रं मुनीरकडे दिली. पण हाच मुनीर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांच्यासाठी धोक्याची घंटा बनला आहे. 

शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आपल्या हातातलं खेळणं बनवून ठेवलंय- (Who Is Asim Munir)

जानेवारी २०२३ मध्ये राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, एप्रिल २०२३ मध्ये भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, जून २०२४ मध्ये वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या बसवर हल्ला, ऑक्टोबर २०२४ मध्ये सोनमर्ग बोगद्यात काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला, या सगळ्या दहशतवादी कारवायांमागे मुनीरचं डोकं होतं. दहशतवाद पसरवण्यासाठी त्यानं पंजाब प्रांतातल्या गँगस्टर्सचीही मदत घेतली होती. असीम मुनीर फक्त पाकिस्तानी सेनाप्रमुखच नाही. तर एक कॉर्पोरेट नेताही आहे. ज्यानं शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आपल्या हातातलं खेळणं बनवून ठेवलंय.

शरीफ सरकारवर मुनीरचा डोळा-

असीम मुनीर शाहबाज शरीफ यांच्याकडून सत्ता बळकवण्याच्या तयारीत आहे. मुनीरवर भ्रष्टाचाराचे आरोपही आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर त्याचं नियंत्रण आहे. पाकच्या नार्कोटिक्स कंट्रोल विभागावार मुनीरचीच खास माणसं आहेत. असीम मुनीर पाकिस्तानच्या कारगील युद्धातल्या पराभवाचा साक्षीदार आहे. त्यानं मुशर्रफ यांच्याप्रमाणेच सियाचीन प्रांतातील सीमेवर तो तैनात होता. पण पाक सेनेतल्या महत्वाच्या पदावर असलेल्या मुनीरनं आता पाकिस्तानातील तमाम सरकारी कंपन्यांवरही आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि तो आता कधीही पाकिस्तानात अंतर्गत बंडाचं निशाण रोवू शकतो. त्यामुळे लवकरच पाकिस्तानात सत्तापालटही होण्याची चिन्ह आहेत.मुनीरनं भारताला सरळसरळ प्रतिकार करण्याऐवजी दहशतवादाची ढाल बनवलीये. आणि त्यातूनच पहलगामसारख्या घटना तो घडवून आणतोय. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांची सत्ता उलथवून टाकली होती आणि आता शाहबाज शरीफ यांची सत्ताही धोक्यात आहे, ती या असीम मुनीरमुळे...त्यामुळे आगामी काही दिवसांत पाकिस्तानात नेमकं काय घडतंय?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंडने रचला पहलगाम हल्ल्याचा कट?; धक्कादायक अपडेट समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget