Pahalgam Terror Attack : कुणी निसर्ग अनुभवत होतं, कोणी तो मोबाईमध्ये टिपत होतं, पण क्षणात सारं काही बदललं! गजबजलेल्या बैसरन व्हॅलीत शुकशुकाट; नुसत्या कल्पनेनं थरकाप
जम्मू-काश्मीरच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात अर्धवट खाल्लेले पदार्थ, बुटांचा टोप्यांचा आणि इतर अनेक पर्यटकांच्या खाणाखुणांसह निव्वळ भयाण शांतता असल्याचे चित्र या बघायला मिळाले आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी नेहमी सारखाच दिवस उजाडला होता. बघता बघता सारी बैसरन व्हॅली (Baisaran Valley) पर्यटकांच्या गर्दीने दुमदुमी लागली. यावेळी कोणी मॅगी खातं होतं, कोणी कुटुंबासोबत सेल्फी काढत होतं, कुणी निसर्ग अनुभवत होतं, तर कोणी तो आपल्या मोबाईमध्ये अविस्मरणीय क्षण म्हणून टिपत होतं. मात्र ऐन सूर्य डोक्यावर आला असताना काश्मीर खोऱ्यात जे झालं त्याचा विचार ही कुणी केला नसेल. पोलीस वेशात काही दहशतवादी आले आणि एका एक गोळीबार सुरू केला. काही कळायच्या आता दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 20हून अधिक जण जखमी झालेत. काश्मीरला भेट देण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सर्व पर्यटकांनी कसा-बसा आपला जीव वाचवत सुरक्षित स्थळी आश्रय घेतला आणि सहल अर्धवट सोडून आपापल्या घरी परतले. हा सारा प्रसंग ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला ते हे क्षण कधीही विसरू शकत नाही.
बैसरन व्हॅलीत पर्यटकांच्या खाणाखुणांसह उरलीय ती भयाण शांतता
दरम्यान, ही दुर्देवी घटना होऊन आज 3 दिवसांचा काळ लोटला आहे. आज त्याच बैसरन खोऱ्यात सध्या शुकशुकाट पसरला आहे. हल्ला झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटकांसह याठिकाणी असलेले स्थानिक आणि व्यापारी देखील आपलं सगळं समान तिथल्या तिथे सोडून सुरक्षित स्थळी आश्रयाला गेले आहे. त्यामुळे आज या जागी अनेक अस्ताव्यस्त झालेल्या खाणाखुणा दिसत आहे.
कधीकाळी पर्यटकांच्या गर्दीने फुललेले भारताचे नंदनवन आज पुन्हा दहशतीची सावटाखाली आले आहे. दरम्यान, घटनेने या परिस्थितीवर पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवत काश्मीर खोऱ्यात सध्या सर्च मोहीम सुरू आहे. मात्र बैसरन खोऱ्यात अद्यापही अर्धवट खाल्लेले पदार्थ, बुटांचा टोप्यांचा आणि इतर अनेक पर्यटकांच्या खाणाखुणांसह उरलीय ती भयाण शांतता, असेच एक चित्र या परिसराचे आहे.
काळी पट्टी बांधून मुस्लिम बांधवानी अदा केली जुमाची नमाज
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ भाईंदर पश्चिमेच्या जामा मस्जिदमध्ये आज मुस्लिम बांधवानी जुमाच्या नमाज दरम्यान हातात काळी पट्टी बांधून नमाज अदा केली. आणि या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांची केलेली हत्या पाहता, देशातील सर्व नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
सर्वांची एकच मागणी आहे की दहशतवाद्यांना आणि दहशतवाद समर्थक पाकिस्तानला यावेळी कठोर धडा शिकवावा. देशातील मुस्लिम बांधवही या दहशतवादी घटनेने अत्यंत व्यथित झाले आहेत. आणि या घटनेला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर व त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करत असल्याचं मुस्लीम बांधवांनी यावेळी सांगितलं आहे.
हे ही वाचा
























