Oscars 2023 : अॅंड द ऑस्कर गोज टू... लॉस एंजेलिसमध्ये रंगणार 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा; जाणून घ्या 'ऑस्कर 2023'बद्दल सर्वकाही...
Oscars 2023 : आज लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

Oscars Awards 2023 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars Awards) सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आज लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) सोहळा पार पडणार आहे. तर भारतीयांना 13 मार्चला पहाटे साडे पाच वाजल्यापासून हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.
भारतही ऑस्करच्या शर्यतीत!
95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars Awards 2023) भारतासाठी खूपच खास आहे. यंदा भारताच्या तीन कलाकृती ऑस्करच्या शर्यतीत आहेत. यआत यात एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर सिनेमाचा समावेश आहे. 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला 'ओरिजनल सॉंग' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. तसेच 'ऑल दॅट ब्रेथ्स' या माहितीपटाला 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. तसेच 'द एलिफेंट व्हिस्परर्स' या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. त्यामुळे आता भारतीयांच्या नजरा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे खिळल्या आहेत.
ऑस्कर पुरस्कार सोहळा कोण होस्ट करणार? (Oscars 2023 Host)
'ऑस्कर 2023' हा पुरस्कार सोहळा जिमी किमेल होस्ट करणार आहे. याआधी 2018 मध्ये जिमीने ऑस्कर पुरस्कार सोहळा होस्ट केला होता. मागील वर्षी रेजिना हॉल, एमी शूमर आणि वांडा साइक्सने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.
'ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत या सिनेमांना नामांकन
- ऑल क्लाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट
- अवतार : द वे ऑफ वॉटर
- द बंशीज ऑफ इनिशरिन
- एल्विस
- एवरीवरी एवरीवेयर ऑल एट वन्स
- द फैबेलमैन्स
- थार
- टॉप गन : मेव्हरिक
- ट्रैंगल ऑफ सॅडनेस
- वीमेन टॉकिंग
'ऑस्कर 2023' पुरस्कार सोहळा कुठे पाहू शकता?
'ऑस्कर 2023' हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना बीसी नेटवर्क केबल, सीलिंग टीव्ही, हुलू प्लस लाइव्ह टीव्ही, यूट्यूब टीव्ही आणि फुबो टीव्हीवर पाहता येईल. तसेच ऑस्करच्या ट्विटर हॅंडलसह एबीबी माझाच्या वेबसाईवरदेखील सिनेप्रेमींना ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सर्व अपडेट्स मिळतील.
View this post on Instagram
'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश
'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
संबंधित बातम्या
Oscar 2023 : 'नाटू नाटू'वर एनटीआर अन् राम चरण नाही...तर 'ही' हॉलिवूड डान्सर थिरकणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
