Nagpur Crime : मुलाखतीला नेण्याचे सांगून नेले पडक्या घरात, नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार
मुलाखतीसाठी कोराडी परीसरित जायचे असल्याचे त्याने तरुणीला सांगितले. ती बसस्थानकावर पोहोचली. त्याने दुचाकीने तिला पारडी रोडवरील पडक्या घरात नेले. नोकरी हवी असेल तर संबंध बनव म्हणून तिच्यावर बळजबरी केली.

नागपूरः कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असलेल्या एका 24 वर्षीय युवतीला नोकरीचे आमिष दाखवून नीलेश हेडाऊ या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. ही घडना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. नीलेश योगेश्वर हेडाऊ (वय 40 रा. हसनबाग) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा म्हाडा कॉलनी, भंडारा येथील राहणारा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी उच्चशिक्षित आहे. तिचे वडील अपंग आहे. आईचे आजारपणात निधन झाले. लहान बहिणीसह ती अंबाझरी परिसरात राहते. वडिलांची जबाबदारी आणि लहान बहिणीच्या शिक्षणाचा खर्च बघता तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
28 जूनला पीडित तरुणीने मोरभवन बसस्थानकावर बसली होती. बसली होती. दरम्यान तिची नीलेश हेडाऊशी भेट झाली. त्याने हॉटेल व्यवसायी असल्याचे सांगून ओळख दिली. नोकरी लावून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नीलेशने स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला. 3 जुलै रोजी दुपारी त्याचा फोन आला. त्याने नोकरीसाठी मुलाखतीला कोराडी परीसरिताली एका हॉटेलमध्ये जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तासभरात तयारी करुन गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचली. त्याने दुचाकीने तिला पारडी रोडने एका मंदिराजवळ पडक्या घरात नेले. तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. नोकरी हवी असेल तर शारीरिक संबंध ठेवण्याची अट ठेवली. तिने नकार देऊन घरी सोडण्याची विनंती त्याला केली. अंधारात कुठीही मदतीला नसल्याचे बघून तिच्यावर बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास तिला घरी आणून सोडले आणि पळ काढला. पीडित तरुणीने अंबाझरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षे कारावास
नागपूरः अल्पवयीन मुलीला धमकी देत बलात्कार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संजय श्यामराम चव्हाण (वय 38 रा. वैशालीनगर झोपडपट्टी, बेलतरोडी) असे या आरोपी नराधमाचे नाव आहे. त्याच्या विरोधात बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्या समक्ष सुनावणी झाली. पीडित मुलीचे आई व वडील दोघेही मजुरी करतात. 14 मे 2018 रोजी पीडितेचे आई-वडील कामावर गेले असताना आरोपी पीडितेच्या घरामध्ये शिरला आणि बलात्कार केला. आई कामावरून घरी आल्यानंतर पीडितेने हा प्रकार सांगितला. वडील गावावरून परत आल्यानंतर तक्रार देऊ असे ठरले होते. मात्र दुसऱ्या दिवशी देखील संजयने हेच कृत्य पुन्हा केले. यामुळे, पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील माधुरी मोटघरे व अॅड. श्याम खुळे यांनी बाजू मांडली.























