(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : रविवारी जागतिक सिकलसेल दिन, नागरिकांनी सिकलसेल तपासणीचा लाभ घ्यावाः आरोग्य अधिकारी
19 जून रोजी जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह आदी आरोग्य केंद्रांवर साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांची याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
नागपूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 19 जून रोजी जागतिक सिकलसेल दिनाचा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व डागा स्त्री रुग्णालय येथे साजरा करण्यात येणार आहे.
या दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सेल्युब्लिटी चाचणी करणे, आवश्कतेनूसार एचपीएलसी चाचणी करून निश्चित निदान व त्याप्रमाणे कार्ड वाटप करण्यात येणार आहे. सिकलसेल रुग्णांची यादी उपलब्ध करून या प्राथमिक उपचार व गरजेनूसार चाचण्या, औषधोपचार व संदर्भसेवा देण्यात येणार आहे. सिकलसेल रुग्ण व वाहक यांना विवाहपूर्व, विवाहानंतर व गरोदरपणात समुपदेशन करण्यात येणार आहे. जनतेमध्ये सिकलसेल आजाराबाबत तपासणी, उपचार, प्रसार व प्रतिबंध याबाबत माहिती तसेच पेन क्रायसिसीबाबत औषधोपचार व आवश्यतेनूसार रक्त संक्रमण यांची शास्त्रोक्त माहिती देण्यात येणार आहे. प्रसुतीपूर्व गर्भजल निदान तपासणीबाबत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे.
काही मिनिटांची चाचणी
या अगोदर ज्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली नसेल त्यांनी स्वत:ची तपासणी करण्यात यावी. ही चाचणी अतिशय साधी व अवघ्या काही मिनिटांची आहे. त्यामुळे नागरिकांनी या सिकलसेल तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी केले आहे.
'समर्थ' योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधा: उपायुक्त
नागपूर : हातमाग विणकर असलेल्या कौशल्य विकासाचे 'समर्थ' या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वस्त्रोद्योग उपायुक्त यांनी केले आहे. केंद्र शासनामार्फत 'समर्थ' योजनेचे दिशानिर्देशाप्रमाणे हातमाग विणकरासाठी कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबत दिशा निर्देश Samarth-textiles.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, ट्रस्ट, कंपनी, इतर सेवा भावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास नवीन प्रशासकीय ईमारत क्रमांक 2 येथील आठव्या माळयावरील प्रादेशिक उपायुक्त नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.
इतर महत्वाच्या बातम्या