Tuberculosis : उपचारासोबतच पोषक आहार घेतल्यास क्षयरोगाचा धोका आणि मृत्युचे प्रमाण होऊ शकते कमी
वाढत्या क्षयरोगाचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्याकरता पोषक आहार परिणामकारक ठरू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. केवळ पोषक आहाराच्या मदतीनेच देशात TB सारख्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो
Adequate Food Can Reduce Death In Tb Patient : भारत सरकार सध्या देशाला टीबीमुक्त करण्याकरता चांगलेच लक्ष देत आहे. 2050 पर्यंत संपूर्ण देशाला टीबीमुक्त करण्याचे भारत सरकारचे मोठे ध्येय आहे. एका अहवालानुसार मागच्या काही वर्षात क्षय रूग्णांची संख्या (Tb Patient) लक्षणीय वाढ पाहायला मिळाली होती. मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये तब्बल 21.42 लाख TB रूग्ण आढळले होते. तर या वर्षी TB च्या रूग्णसंख्येत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या वाढत्या क्षयरोगाचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्याकरता पोषक आहार परिणामकारक ठरू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. केवळ पोषक आहाराच्या मदतीनेच देशात TB सारख्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. देशात या संबंधित एक चाचणी करण्यात आली त्या चाचणीत असे आढळून आले की, पोषक आहार क्षयरोग टाळण्यास आणि आधीच संक्रमित झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते.
आॅगस्ट महिन्यात झारखंडमधील चार जिल्ह्यात केलेल्या परिक्षणात आढळून आले की, पोषणाची योग्य पद्धतीने घेतल्यास TB सारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होऊ शकतो. 'द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ'मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की हा उपाय क्षयरोगाचा धोका 48 टक्क्यांनी कमी करण्यात उपयुक्त ठरू शकतो.
या चाचणी अंतर्गत सहभागी झालेल्या लोकांना सहा महिन्यांकरता पोषक आहार देण्यात आला ज्यामध्ये 5 किलो तांदूळ , 1.5 किलो तूर डाळ आणि इतर पौष्टिक पदार्थ देण्यात आले. सोबतच TB ने ग्रस्त असणाऱ्या 2800 रूग्णांना देखील पोषक आहार देण्यात आला. संशोधकांना असे आढळून आले की, ज्या लोकांना पोषक आहार देण्यात आला आहे, त्यांच्या शारिरीक स्थितीत मोठा बदल झाला आहे. यानंतर संशोधकांनी एक अहवाल सादर केला ज्यात लक्षात आले की. TB चे निदान झाल्यानंतर तात्काळ चांगला आहार रूग्णांना देण्यात आला तर मृत्यूचा धोका 60% कमी होतो.
संशोधक काय म्हणतात
डॉ अनुराग भार्गव यांनी सांगितले की, कुपोषण आणि असंतुलित आहार या कारणांमुळे TB रूग्णांमध्ये मृत्युचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. कुपोषण हे TB होण्याचे महत्वाचे कारण ठरू शकते. दरवर्षी कुपोषणामुळे 40 % लोकांना
TB ची लागण होते. तसेच मधुमेह , धुम्रपान ,मद्यपान यामुळे देखील TB होण्याची शक्यता असते.
उपचारासोबत योग्य पोषण देखील महत्त्वाचे आहे
एनआयआरटी (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस), चेन्नई यांनी केलेल्या पूर्वीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 35 किलोपेक्षा कमी वजन असलेल्या क्षयरुग्णांचा मृत्यूदर 45 किलोपेक्षा जास्त वजन
असलेल्या रुग्णांपेक्षा चार पट जास्त होता. म्हणजेच रुग्णांना वेळेवर उपचारासोबतच योग्य पोषण आहार मिळाल्यास मृत्यूही कमी होण्यास मदत होऊ शकते.