एक्स्प्लोर

नवी मुंबईतील APMC मध्ये येणाऱ्या गाड्यांना थेट मुंबई, ठाण्यातील मार्केटमध्ये प्रवेश, जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारचा निर्णय

Mumbai Maratha Reservation Protest : शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा पनवेलनंतर थेट एमटीएचएल मार्गे मुंबईत विविध भाजी मंडई आणि भाजी मार्केट पोहोचवण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. 

मुंबई: मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्याचबरोबर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी मिळाव्यात  यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तू घेऊन एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या गाड्या या शनिवारी मार्केटमध्ये न आणता थेट मुंबई, ठाणे आणि इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात आणत त्या ठिकाणच्या मार्केटमध्ये सेवा पुरवण्यासाठी सरकारने मुभा दिली आहे. 

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा पनवेलनंतर थेट एमटीएचएल मार्गे मुंबईत विविध भाजी मंडई आणि भाजी मार्केट पोहोचवण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. 

नवी मुंबईत मराठा आंदोलनामुळे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि माल वाहतूकदारांच्या शेतमाल व इतर खाद्यपदार्थांच्या वितरणासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व अधिनियम 1963 कलम 59 अन्वये तरतुदीमध्ये सूट देण्यात आली आहे. 

मनोज जरांगेंचा मुक्काम वाशीमध्ये

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांचा आजचा मुक्कामही वाशीतील एपीएमसीमध्ये आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून त्यासंबंधी आजच अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे हे शुक्ववारी मुंबईतील आझाद मैदानाकडे जाणार होते. पण मराठा समाजाच्या मोर्चातील लोकांची संख्या लक्षात घेता त्यांना वाशीमध्येच थांबवण्यास राज्य सरकारला यश आलं आहे. 

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

सरकारने आपल्या सर्व मागण्यावर सकारात्मक असल्याचं सांगितलं, मग आम्हा एक पाऊल मागे घेतो, सरकारने एवढं केलं असलं तर मग आम्ही आझाद मैदानाकडे जाणार नाही, आजची रात्र इथेच काढतो, सरकारने आजच्या रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलीय. नसेल तर उद्या दुपारपर्यंत अध्यादेश द्या, नाहीतर पुन्हा मुंबईकडे निघणार असा इशाराही त्यांनी दिला.

जो अध्यादेश आपण काढणार आहात त्यामध्ये मोफत शिक्षण, सगेसोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट आणि सरकारी भरती केलाच तर आमच्या जागा राखीव ठेऊन करा या गोष्टींचा समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. 

मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय? 

- नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
- शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. 
- कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत करा.
-  जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
- आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा .
- आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
- SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या .
- वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
- रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget