मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्याची हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण, वाशीतील घटना
Navi Mumbai MNS : मराठी गाणं लावण्यास नकार, मनसेच्या राड्यानंतर थेट झिंगाट
Navi Mumbai washi MNS : हॉटेलमध्ये मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हॅाटेल व्यवस्थापकाला बेदम चोप दिला आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वाशीमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून हॅाटेल व्यवस्थापकाला मारहाण चोप देण्यात आला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील सतरा प्लाझा मधील द टेस्ट ॲाफ पंजाब हॅाटेल व्यवस्थापकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. हॅाटेलमध्ये मराठी गाणी लावा, अशी मागणी करूनही याकडे व्यवस्थापकाने दुर्लक्ष केले. वारंवार सांगितल्यानंतरही हॉटेल व्यवस्थापकाने मराठी गाणी लावली नाहीत. याबाबत मनसे पदाधिकारी यांनी विचारणा केली असता हॉलेट व्यवस्थापकाकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या मनसेतील वाशी पदाधिकार्यांकडून हॅाटेल व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर हॅाटेल मालकांने याबाबत दिलगिरीचे पत्र पोस्ट करण्यात आले आहे.
नाहीतर मनसेचा आवाज निघणार
द ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये एका कंपनीच गेट टुगेदर सुरु होतं...मराठी गाणं लावण्यासाठी कंपनीचे कर्मचारी आग्रही होते...मॅनेजर आणि डीजेने त्यांना नकार दिला. मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसैनिक गेले. पहिल्यांदा हात जोडून नंतर हात सोडून भाषा सांगितल्यावर मराठी गाणं लावण्यात आलं. मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांचं कौतुक ही मुजोरी शहरांमध्ये वाढत चालली आहे...मराठी गाणं महाराष्ट्रात वाजवलंच पाहिजे. नाहीतर मनसेचा आवाज निश्चित निघणार हा धमकीवजा इशारा यावेळी नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंनी दिला.
मराठी गाणी लावणार नाही म्हणून नवी मुंबईत हॉटेल चालकाची दादागिरी .
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 24, 2022
नवी मुंबई मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रसाद देताच "झिंगाट "
इथे माज मराठी माणसाचाच चालणार .. माय मराठीसाठी कुठे ही तडजोड केली जाणार नाही ..नवी मुंबई वाशी महाराष्ट्रसैनिकांचा अभिमान आणि खूप कौतुक.
#मराठीप्रथम pic.twitter.com/UH6DTphYLz
मराठी गाणी लावणार नाही म्हणून नवी मुंबईत हॉटेल चालकाची दादागिरी . नवी मुंबई मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रसाद देताच "झिंगाट " इथे माज मराठी माणसाचाच चालणार .. माय मराठीसाठी कुठे ही तडजोड केली जाणार नाही ..नवी मुंबई वाशी महाराष्ट्रसैनिकांचा अभिमान आणि खूप कौतुक, असे ट्वीट गजानन काळे यांनी केलेय.
आणखी वाचा :