Diwali 2025: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्रासह 38 मुख्य सचिवांना नोटीस, म्हणाले, फेरीवाल्यांना त्रास नको...
फेरीवाल्यांना प्रशासनाच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागतो. याविषयी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी सुनावणी घेऊन 38 मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे.

नवी दिल्ली : देशभरात दिवाळी सणाची धामधूम सुरु आहे. बाजारपेठा ग्राहकांनी तुडुंब भरल्याअसून सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. अशातच दीपावलीच्या निमित्ताने पणती, सजावटीचे सामानसह इतर वस्तू विकण्यासाठी रस्त्यावर व्यवसाय करतात. अशा फेरीवाल्यांना प्रशासनाच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागतो. याविषयी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर मानवाधिकार आयोगाचे (National Human Rights Commission) सदस्य प्रियांक कानूनगो यांनी सुनावणी घेऊन महाराष्ट्रासह 38 मुख्य सचिवांना नोटीस (National Human Rights Commission issues Notice) जारी केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळसणात प्रशासनाकडून गरीब फेरीवाल्यांना देण्यात येणारा त्रासाबद्दल महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
National Human Rights Commission Issues Notice: मानवाधिकार कायदा कलम 12 अंतर्गत आयोगाकडून दखल
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्रासह 38 मुख्य सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात अग्निशमन प्रतिबंधनाच्या नावाखाली छळवणूक नको, अग्निशमनासाठी प्रतिबंध करणे हि प्रशासनाची जबाबदारी असल्याचे म्हटलं आहे. स्थानिक प्रशासन व्यापाऱ्यांशी संगनमत करून छोट्या फेरीवाल्यांचा छळ करत असल्याचा आरोप देखील यातून करण्यात आला आहे. मानवाधिकार कायदा कलम 12 अंतर्गत आयोगाकडून हि दखल घेण्यात आली आहे. दिपावलीत दंड / जबरदस्ती माल उचल नको असे मानवाधिकार आयोगचे म्हणणे आहे. परिणामी यावर मुख्य सचिवांना कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Diwali 2025: दिवाळीसाठी बाजारपेठेत एक मराठा लाख मराठाच्या आकाश कंदीलाच विशेष आकर्षण
दिवाळीचा सण फटाके आणि आकाश कंदील शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हिंगोलीच्या बाजारपेठे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रंगीबेरंगी लहान मोठ्या आकाराचे वेगवेगळ्या नक्षीचे आकाश कंदील हिंगोलीच्या बाजार विक्रीसाठी दाखल झाले आहेत आणि हेच आकाशकंदील खरेदी करण्यासाठी आता हिंगोली कर गर्दी करू लागले आहेत. आकाश कंदीलाचे भाव गत वर्षीच्या तुलनेत स्थिर असून एक मराठा लाख मराठा च्या आकाश कंदीलाची विशेष मागणी पाहायला मिळत आहेत दिवाळी हा सण दिव्यांचा उजेडाचा सण असतो त्यामुळे आकाश कंदीलाच या सणामध्ये खूप मोठे महत्त्व असतं दरम्यान या रंगीबिरंगी आकाश कंदीलाने हिंगोलीची बाजारपेठ उजळून निघाली आहे.
महत्वाच्या बातम्या:


















