एक्स्प्लोर
Advertisement
Unani kadha | हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात कोरोनाला रोखणारा 'युनानी काढा'
हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात कोरोना विषाणू संसर्ग रोखणारा युनानी काढ्याला आता राज्यभरातून मागणी होत आहे.
मालेगाव : कोरोना संसर्गाचे कधीकाळी हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनाला अटकाव करणारा युनानी काढ्याच्या मालेगाव पॅटर्नची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या काढ्यासाठी मालेगावच्या मन्सुरा कॉलेजचे मोठ योगदान असून या काढ्याला राज्यभरातून मागणी होत आहे.
मालेगावमध्ये मार्च महिन्याच्या आठ तारखेला पहिले पाच रुग्ण आढळले आणि त्यातील एकाचा पहिला मृत्यू झाला. त्यानंतर मालेगावमध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागताच सर्वांसाठी तो गंभीर विषय बनला. पाहता पाहता मालेगाव मुंबई, पुणे पाठोपाठ कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्यस्तरावरुन विविध प्रयत्न सुरू झाले. मालेगावातील कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकारने केली. प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी त्याकाळात सोपविण्यात आली. मात्र, असे असतानासुध्दा रोज पंधरा वीसच्या पुढेच रुग्णांचे पॉझेटिव्ह अहवाल येऊ लागले.
याच काळात रमजानचा महिना सुरु झाला. त्यामुळे प्रशासनानाने अधिकच काळजी घेण्यास सुरुवात केली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टापे यांनी मालेगावकडे विशेष लक्ष देत दोन वेळेला मालेगावमध्ये भेट देत आरोग्य यंत्रणेला विशेष सुचना दिल्या. शिवाय तेथिल डॉक्टरांशी चर्चा केल्या. विशेषता पुर्व भागातील मुस्लीम बहुल भागातील डॉक्टरांना त्यांनी येणाऱ्या रुग्णांना कशा पध्दतीने ट्रीट केले जात असल्याची माहिती घेतली आणि ते करत असलेल्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे गल्ली मोहल्यात येत असलेल्या रुग्णांना योग्य ती ट्रिटमेन्ट मिळत गेली. या काळात सरकारच्या आयुश विभागाने होमीयोपॅथि आणि युनानी औषधांना परवानगी दिली.
कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगांव नियंत्रणात, प्रशासनाचे 'मिशन मालेगांव' यशस्वी
मालेगावच्या मन्सुरा युनानी कॉलेजचा पुढाकार
सरकारने होमियोपॅथी आणि युनानी औषधांना परवानगी दिल्यानंतर मालेगाव शहरात त्याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. याच काळात मालेगावच्या मन्सुरा युनानी कॉलेजने पुढाकार घेत आयुषच्या निकषानुसार वेगवेगळ्या 9 औषधांचा वापर करत काढा तयार केला. हा काढा सुरवातील विशेषत फ्रन्टलाईनवर काम करणाराऱ्या बंदोबस्तावरील पोलिसांना, प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम समोर आला. मालेगावमध्ये अॅलोपॅथि डॉक्टर त्यांच्या औषधां बरोबरच मन्सूरा कॉलेजने तयार केलेला काढा देत असल्याने दुहेरी फायदा होऊन त्याचा परिणाम या काळात समोर आला. या काढ्यामुळे कोरोना संसर्गावर मात होते, असे नसले तरी रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाची क्षमता त्यात असल्याने मालेगावच्या पुर्व म्हणजेच मुस्लीम बहुल भागात त्याला अधिक महत्व प्राप्त झाले. या काढ्याने ताप, खोकला, घसा यासह विविध आजारांवर मात करता येत असल्याने रुग्ण संख्या घटण्यात मदत झाली.
युनानी काढ्याला मालेगावसह राज्यभरातून मागणी
होमियोपॅथीच्या औषधांबरोबरच मालेगावमध्ये युनानी काढ्याची अधिक चर्चा झाली. हा काढा अनेकांनी वापरला आणि त्यापासून फायदा झाला. केवळ मुस्लीम बहुलच नाही तर पश्चिम भागातील नागरीक सुध्दा आता हा काढा मिळावा यासाठी प्रय्तन करु लागले आहे. केवळ चार दिवस सकाळ आणि संध्याकाळ हा काढा सांगितलेल्या पध्दतीने घेतल्यास रुग्णांची किंवा सर्वसामान्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. एकुणच मालेगाव पॅर्टन म्हणून ओळखला जाणाऱ्या मन्सुरा युनानी कॉलेजच्या या काढ्याची संपुर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू झाल्याने या युनानी काढ्याला मोठी मागणी मालेगावसह राज्यभरातून होत आहे.
Malegaon #Corona मालेगावातील कोरोना कसा नियंत्रणात आला? नेमकं काय आहे मालेगाव पॅटर्न? स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
मुंबई
Advertisement