एक्स्प्लोर
मालेगाव निवडणुकीत एकाच कुटुंबातील MIMचे तिघंही विजयी

मालेगाव : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने जोरात मुसंडी मारत चांगलं यश मिळवलं आहे. 35 पैकी सात जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. एमआयएमकडून एकाच पक्षाकडून पाच पैकी तीन उमेदवार निवडून येण्याची पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. विद्यमान उपमहापौर युनूस ईसा यांच्यासह त्यांचे दोन्ही मुलंही निवडून आले आहेत. डॉ. खालीद परवेज आणि माजीद हाजी हे देखील विजयी झाले आहेत. तर माजी महापौर अब्दुल मलिक आणि सून तसलिन खालिद परवेज यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला एकाच कुटुंबातील पाचही सदस्य विजयी झाल्याचं घोषित करण्यात आल होतं मात्र, विरोधकांनी फेर मतमोजणी मागणी केली. त्यामध्ये माजी महापौर अब्दुल मलिक आणि तसलिन परवेज खालिद यांचा पराभव झाला. दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख आणि माजी महापौर ताहेरा रशीद शेख हे दोघे पती-पत्नी विजयी झाले. मात्र त्यांचा मुलगा काँग्रेसचा गटनेता हाजी खालीद शेख मात्र, पराभूत झाला. एकूणच या वेळच्या निवडणुकीत काँग्रेस एमआयएममध्ये घराणेशाही पाहायला मिळाली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























