एक्स्प्लोर
गळा दाबून पत्नीची हत्या, पोलिसांनी पतीच्या मुसक्या आवळल्या
नाशिकमधील विहीतगाव येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

नाशिक : नाशिकमधील विहीतगाव येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. मृत महिलेचं नाव साक्षी हांडोरे असून तिचा पती उल्हास हांडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. पती उल्हास हांडोरेनं चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. साक्षी हांडोरेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या नवऱ्याने रचला होता. पण पोलीस तपासात तिची गळा दाबून हत्या झाल्याचं उघड झालं. ही हत्या तिच्या नवऱ्यानेच केल्याचं तपास समोर आलं. याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये उल्हास हांडोरेसह त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण























