एक्स्प्लोर
Advertisement
सदाभाऊंच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 'कांदा-भाकरी खाओ' आंदोलन
नाशिक : राष्ट्रवादी पाठोपाठ सत्तेत सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कांद्याला हमी भाव मिळावा, यासाठी 'कांदा-भाकरी खाओ' आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनावेळी कांद्याला हमी भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली. सरकारने 1 रुपये दिलेले अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असा अरोप यावेळी करण्यात आला. कांद्याला 1 रुपया नाही तर 5 रुपये किलो अनुदान द्यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सरकारला लक्ष्य केले. त्यांनी यावेळी कांद्याच्या प्रश्नावरून मंत्री सदाभाऊ खोत यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याच पक्षाने सरकारला लक्ष्य केल्याने, राज्य सरकारमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
रत्नागिरी
नाशिक
क्राईम
Advertisement