एक्स्प्लोर
राम जन्मला गं सखे...! अयोध्येपासून शिर्डीतही रामजन्माचा उत्साह

मुंबई: राम नवमीचा उत्सव आज देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो आहे. दिल्लीच्या राम मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. राम नवमीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलंय. तर शिर्डीतही राम नवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. रामनवमी उत्सव दिनानिमित्त काल रात्रभर साईमंदिर खुले ठेवण्यात आले होते. साईभक्तांच्या सुरक्षेची, राहण्याची, भोजनाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे. पंढरपूर प्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाचा गजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे.
आणखी वाचा























