एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरवर बक्षिसांचा वर्षाव; नाशिक महापालिकेकडून होणार नागरी सत्कार
हर्षवर्धन सदगीरच्या रुपानं पहिल्यांदाचा नाशिकमध्ये महाराष्ट्र केसरीची गदेचा मान आला आहे. त्यामुळे हर्षवर्धनवर सध्या बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
नाशिक : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून त्याच्यावर बक्षिसाचा वर्षाव केला जात आहे. इगतपुरी तालुक्यातील ग्रामस्थांच्या माध्यमातून हर्षवर्धनला स्विफ्ट कार भेट देण्यात आली आहे. नाशिकच्या मातीतील पैलवान पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी झाल्यानं त्याचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत केलं जातं आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा इगतपुरीमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर हर्षवर्धनच्या हातात नव्या कोऱ्या गाडीची चावी देण्यात आली.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस हर्षवर्धनचा नाशिक महापालिकेच्या माध्यमातून नागरी सत्कारही केला जाणार आहे. नाशिक जिल्हा इतर मैदानी खेळांमध्ये कायमच अग्रेसर राहिला आहे. कविता राऊत, मोनिका आथरेसारखे अनेक धावपटू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सोनेरी कामगिरी बजावून आपल्या नावाची मोहर उमटवत आहेत. दत्तू भोकनळ सारखा भारतीय सैन्य दलातील जवान रोइंग क्रिडा प्रकारात नाशिकचे नाव उंचावत आहेत. सायकल, मल्लखांब, कबड्डी, क्रिकेट अनेक स्पर्धांमध्ये नाशिकचे खेळाडू चमकदार कामगिरी बजावत आहेत, नुकत्याच ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत नाशिकच्या चौघांनी विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळे बुद्धिबळ, रायफल शूटिंग पासून ते रोइंगपर्यंत सर्वच क्रीडा प्रकारात नाशिकच्या खेळाडूंचा दबदबा आहे. त्याला अपवाद कुस्तीचा होता.
पहिल्यांदाच नाशिकमध्ये महाराष्ट्र केसरीचा मान -
नाशिककमध्ये कुस्ती, तालीम संघाची जुनी परंपरा आहे. मात्र, महाराष्ट्र केसरी पदकाला आजवर कोणाला गवसणी घालता आली नव्हती, ती कसर नाशिकच्या मातीत वाढलेला डावपेच शिकलेल्या हर्षवर्धन सदगीरने भरुन काढली. त्यामुळेच सर्वच क्षेत्रातून हर्षवर्धनवर कौतुकाचा वर्षाव होतोय, रविवारी नाशिक नगरीत आणि भगूर गावात हर्षवर्धनचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुधवारी इगतपुरी तालुक्यातील ग्रामस्थांनी हर्षवर्धनच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतानाच नवीकोरी स्विफ्ट कार त्याला भेट दिली. यापुढे जे जे पैलवान अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतील त्यांना सर्वोतपरी मदत करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केल्यानं नवीन खेळाडू तयार होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळेच नाशिक महापालिकाच्या माध्यमातून हर्षवर्धन सदगीर नागरी सत्कार केला जाणार आहे.
एकाच तालमीतील दोन पैलवान अंतिम फेरीत -
महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या अंतिम सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली आहे. हर्षवर्धनने शैलेश शेळके याचा 3-2 असा पराभव केला आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन आणि शैलेश दोघेही वस्ताद काका पवार यांचे शिष्य आहेत. दोघेही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत.
संबंधित बातमी - Maharashtra Kesari 2020 : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने उंचावली चांदीची गदा, लातूरचा शैलेश शेळके पराभूत
Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची वाजतगाजत मिरवणूक | नाशिक | खेळ माझा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement