एक्स्प्लोर
नांदगाव भूखंड घोटाळा : 11 सरकारी अधिकाऱ्यांसह 23 जणांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक : नांदगावमध्ये भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे या घोटाळ्यातील 23 आरोपींमध्ये 11 आरोपी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. 3 कोटी 85 लाखाचा महसूल बुडवून सरकारी जमीन परस्पर बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. लाचलुचपत विभागाने कारवाई करत 23 आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
येवला उपविभागीय अधिकारी वासंती माळी, नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन, तहसिलदार पुनम दंडीले यांच्यासह 11 सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि इतर 12 जण असे एकूण 23 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदगाव तालुक्यातील गणेश नगरमधील सरकारी मालकीचा मोठा भूखंड नांदगावचे निलंबित तहसिलदार सुदाम महाजन यांनी परस्पर विक्री केल्याची तक्रार करण्यात आली होती. सरकारी जमीन नजराणा न भरता, विभागीय आयुक्तांच्या आदेशाविनाच परस्पर विकण्याचा उद्योग सुदाम महाजनने केला.
गेल्या 6 महिन्यापासून याचा तपास सुरु होता. तपासांअंती या प्रकरणी महाजनसह 4 तलाठी, 2 मंडलअधिकारी, अव्वल कारकून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र प्रभारी तहसीलदार पूनम दंडिले यांनी त्यासाठी टाळाटाळ केली.
येवल्याच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुदाम महाजन यांना या भुखंड घोटाळ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केल्याप्रकरणी या सर्व 11 सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करुन बेकायदेशीररित्या खरेदी करणाऱ्या 12 नागरीकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणांमुळे महसूलमधल्या सरकारी बाबूंचा गोरखधंदा उघड झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement