एक्स्प्लोर
नाशकात ट्रक-पिकअप-रिक्षाचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये ट्रक, पिकअप व्हॅन आणि रिक्षा यांच्या तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिकअप व्हॅनचालक आणि ट्रक ड्रायव्हरलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पंचवटीतील अमृतधाम परिसरात नाशिक-आग्रा महमार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रिक्षाचालक रवी बोचरे प्रवासी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी ओझरहून येणारा ट्रक आणि पंचवटीकडून येणाऱ्या पिकअप व्हॅनची जोरदार धडक झाली आणि ही दोन्ही वाहनं रिक्षावर जाऊन आदळली.
दोन्ही वाहनांमध्ये सापडून रवी बोचरे जागीच मृत्युमुखी पडला, या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्गवर काही काळ रास्ता रोको करत तो रोखून धरला होता. वारंवार या भागात अपघात होत असून यावर काहीतरी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.
या अपघाताचा जागेवरच पंचनामा होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका यावेळी नागरिकांनी घेतल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांसह रॅपिड अॅक्शन फोर्सलाही पाचारण करण्यात आले.
अखेर पोलिसांनी जागेवरच पंचनामा सूरु केल्याने नागरिकांनी रास्तारोको मागे घेतला. फरार पिकअप व्हॅनचालक आणि ट्रक ड्रायव्हरलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement