एक्स्प्लोर
उन्हाळ्यामुळे कुटुंब टेरेसवर झोपायला, घरात लाखोंची चोरी
![उन्हाळ्यामुळे कुटुंब टेरेसवर झोपायला, घरात लाखोंची चोरी Nashik Theft In Flat While Family Was Sleeping On Terrace Due To Heat उन्हाळ्यामुळे कुटुंब टेरेसवर झोपायला, घरात लाखोंची चोरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/29162331/nashik-terrace-chor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : उन्हाळ्याच्या दिवसात घरात गरम होत असल्यामुळे अनेक जण गच्चीवर झोपणं पसंत करतात. मात्र हीच सवय नाशिकच्या संजय निकम आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगलीच महागात पडली आहे. निकम कुटुंब गारेगार हवेत झोपलं असताना चोरांनी त्यांच्या घरात डल्ला मारला.
निकम कुटुंबिय काही वर्षांपासून नाशिकच्या सिडकोतील विजयनगर परिसरात राहतं. गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिकमध्ये कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे नाशिकमधील, विशेषतः सिडकोतील अनेक कुटुंबीय गच्चीवर गार हवेत झोपण्याला पसंती देतात.
नववर्षाच्या स्वागतासाठी सकाळी लवकर उठून घरी गुढी उभारण्यासाठी निकम कुटुंबीय सोमवारी रात्री लवकर घराला कुलूप लावून गच्चीवर झोपलं. मंगळवारी पहाटे दूधवाला येताच, दाराचा कडी-कोयंडा तोडून घरात चोरी झाल्याचं उघडकीस आलं.
निकम यांचे अंबड परिसरात चहाचे हॉटेल आहे. तसेच त्यांची शेती असून शेतातील मका विकून स्वयंपाकघरात एका डब्यामध्ये ठेवलेले अडीच लाख रुपये आणि पत्नीचे सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल निकम कुटुंबिय गच्चीवर झोपल्याची संधी साधत चोरांनी लांबवला.
विजयनगर सारख्या गजबजलेल्या परिसरात चोरी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अंबड पोलिस स्टेशनला याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरांचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)