एक्स्प्लोर
सोनू, तू पोलिसांशी नीट बोल, नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून जनजागृती!
नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोनूवर गाणं म्हणून नाशिक पोलिसांसह हेल्मेटबद्दल जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.
नाशिक : सोशल मीडियावर सोनूचा धुमाकूळ सुरुच आहे. आरजे मलिष्कामुळे पुन्हा चर्चेत आलेल्या सोनू या गाण्याचा वापर गेल्या महिन्याभरात अनेकांनी केला. यातच नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोनूवर गाणं म्हणून नाशिक पोलिसांसह हेल्मेटबद्दल जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.
ट्रॅफिकचे नियम पाळा, हेल्मेटचा वापर करा, असा संदेश नाशिकमधील इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सोनू गाण्यातूव दिला आहे. तसंच आता तरी पोलिसांशी नीट बोल असा संदेशही नाशिककरांना दिला आहे.
सोनूच्या गाण्याचे अनेक अनोखे व्हर्जन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र नाशिकमधल्या या चिमुकल्यांचं 'सोनू' सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement