एक्स्प्लोर
लग्नाला घरच्यांचा विरोध, नाशकात नर्सचा हॉस्टेलमध्ये गळफास
मूळ केरळच्या अश्विनीने मांजाच्या सहाय्यानं फॅनला गळफास घेऊन हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली.
नाशिक : नाशिकच्या अपोलो रुग्णालयाच्या नर्सिंग हॉस्टेलमध्ये 24 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. अश्विनी केके अपोलो रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. गुरुवारी रात्री तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
अश्विनीनं मांजाच्या सहाय्यानं फॅनला गळफास घेऊन हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. अश्विनी मूळची केरळच्या त्रिचूर जिल्ह्यातली होती. कामानिमित्त गेल्या काही महिन्यांपासून ती नाशिकमध्ये वास्तव्यास होती.
अश्विनीच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली. आपलं एका मुलावर प्रेम होतं, मात्र घरच्यांचा लग्नाला नकार असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं तिने चिठ्ठीत लिहिलं आहे. कोणालाही जबाबदार न धरण्याचं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
गुरुवारी अश्विनीची नाईट शिफ्ट होती. नऊ वाजून गेल्यानंतरही ती न आल्यामुळे मैत्रिणींनी तिच्या रुममध्ये डोकावलं. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, नाशकातील आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement