CNG price : नाशिककरांच्या खिशाला पुन्हा कात्री, सीएनजीच्या दरात वाढ
CNG price : नाशिकमध्ये नैसर्गिक वायू अर्थात सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींबरोबर सीएनजी वाहन धारकांनाही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
CNG price : नाशिककरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. शहरात आज मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळं नाशिककरांना एक किलो सीएनजीसाठी आता 91 रुपये मोजावे लागणार आहेत.
एकीकडे महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून दुसरीकडे सातत्याने जीवनावश्यक वस्तुंच्या दरात वाढ होत आहे. किराणा, खाद्यतेल, भाजीपाला आदींच्या किंमती गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत असताना आता सीएनजी देखील वाढला आहे.
नाशिकमध्ये नैसर्गिक वायू अर्थात सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींबरोबर सीएनजी वाहन धारकांनाही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
दोन महिन्यांत चौथ्यांदा वाढ
नाशिकमध्ये गेल्या दोन महिन्यात सीएनजीचे दर प्रतिकिलो 17 रुपयांनी वाढले असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशकात सीएनजीचे दर प्रतिकिलो 71 रुपये ऐवढे होते. आणि आता हेच दर 91 रुपयांवर पोहचल्यामुळे नाशिककरांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. याआधी सीएनजीचा दर हा 89 रुपये होता. मात्र पुन्हा एकदा भाववाढ झाल्याने नाशिकरांच्या खिशाला झळ बसणार असून वाढत्या महागाईने नाशिककर हैराण झाले आहेत.
पेट्रोल- डिझेल दरही वाढले!
दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ झाली असून नाशिकमध्ये पेट्रोल 25 पैशांची वाढून 111.76 वर पोहचले आहे. तर डिझेल दरातही 21 पैशांची वाढ झाली आहे. आज डिझेल चा दर 96.19 इतका आहे. त्यामुळे दर वाढता वाढे अशी स्थिती सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. वाढत्या महागामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
महत्वाच्या बातम्या