Nashik Crime : नाशिकच्या सर्व आधार आश्रमांचे ऑडिट झालंच पाहिजे, त्या प्रकरणी चित्रा वाघ संतापल्या...
Nashik Crime : नाशिकसह (Nashik) राज्यातील सर्व आधार आश्रमांचे (Aadhar Ashram) ऑडिट झालेच (Audit) पाहिजे.
Nashik Crime : नाशिकसह (Nashik) राज्यातील सर्व आधार आश्रमांचे (Aadhar Ashram) ऑडिट झालेच (Audit) पाहिजे. किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत? किती बेकायदेशीररीत्या चालवले जात आहेत हे उजेडात आलेच पाहिजे, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. त्यामुळे नाशिकच्या घटनेनंतर हि बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल या आश्रमात संस्थाचालकाने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर काही दिवसांपूर्वी नाशिक त्र्यंबक रोडवरील (Trimbak Road) आधारतीर्थ आश्रमात एका लहानग्याचा खून (Murder) करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दोन्ही घटनांमधील संशयितांविरोधात ठोस कारवाई करून आश्रमाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात अनेक पक्ष संघातांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आधार तीर्थ आश्रमातील गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या कि, नाशिक शहरातील सुरू असलेल्या आश्रमांची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी या आधार आश्रमांनी शासनाची योग्य अशी परवानगी घेतली नसल्याचे ते आधार आश्रम बंद करण्यात यावेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले तसेच छायाछत्र हरपलेली बालके यांची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे. किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत आणि किती बेकायदेशीर रीत्या चालवले जाताहेत हे उजेडात आलेच पाहिजे, तातडीने संबंधित आधार तीर्थ आश्रमांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नाशिक म्हसरूळ द किंग फाउंडेशन ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. म्हसरूळ शिवारात असलेल्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात २०१८ ते २०१९ या कालावधीत संशयित मोरे याने मुलीचा विनयभंग तसेच अत्याचार केल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. मुलीच्या घरच्यांना फूस लावून तुमच्या मुलीच्या शिक्षणाची राहण्याची व्यवस्था करतो असे सांगत आदिवासी मुलींना आश्रमात आणले जात असल्याचे समोर आले आहे. अनेकदा मुलींनी याबाबत विचारणा केली, मात्र आश्रमातून काढून टाकण्याच्या धमकीने मुलीं तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे समजते. मात्र आता पोलिसांकडून कठोर पाऊले उचलून याबाबत ठोस उपपयोजना करणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.
नाशिकच्या आधार आश्रमांची तपासणी
दरम्यान नाशिक शहरातील आणि त्र्यंबक रोडवरील आधारतीर्थ आश्रमातील दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या असून याबाबत आता ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे अनेक आश्रम अस्तित्वात आहेत. या सर्व आश्रमाची पोलखोल करण्याची गरज असल्याचे या घटनांवरून दिसून येते. अनेकदा मुलांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे, टॉर्चर करणे आदी प्रकार अशा आश्रमांत सर्रास होतात. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येते. अशाच पद्धतीने आश्रम चालकांचे फावते, अशातूनच त्र्यंबक, म्हसरूळ सारख्या घटना घडतात. मात्र यावर आता कठोर अंमलबजावणी हणे आवश्यक असल्याचे दिसते.