एक्स्प्लोर
नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई विमानसेवा बंद
28 मार्चपासून या सेवा पुन्हा सुरु करण्यात येतील, अशी माहिती एअर डेक्कन कंपनीकडून देण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील प्रवाशांना दिलासा देत मोठ्या काही दिवसांपूर्वी थाटात सुरु झालेली नाशिक-मुंबई विमानसेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणांमुळे 15 मार्चपासून नाशिक-मुंबई विमानाचं उड्डाण झालेलं नाही. इतकंच नाही तर नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई या विमानसेवाही बंद झाल्या आहेत. 'एअर डेक्कन' ही विमान कंपनी या सेवा पुरवते. मात्र तांत्रिक कारणांमुळे या मुंबई-नाशिक, नाशिक-पुणे आणि मुंबई-जळगाव ही विमान सेवा थांबवण्यात आली आहे. दरम्यान, 28 मार्चपासून या सेवा पुन्हा सुरु करण्यात येतील, अशी माहिती एअर डेक्कन कंपनीकडून देण्यात आली आहे. उडाण योजनेअंतर्गंत 24 डिसेंबरपासून नाशिक-मुंबई विमानसेवा सुरु झाली होती. अनेक दिवस शुभारंभ लांबल्यानंतर अखेर या विमानसेवेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यांतच तांत्रिक कारणांमुळे ही सेवा स्थगित झाली.
Before You Go
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
महत्त्वाच्या बातम्या
Blog
व्यापार-उद्योग
मुंबई
पुणे






















