एक्स्प्लोर

बलात्काराचा गुन्हा लपवण्यासाठी जात पंचायतीने कुटुंबाला वाळीत टाकलं

आरोपीने बलात्काराचा गुन्हा केल्याचं बाँड पेपरवर कबूल करत आपल्या कृत्याचा एक प्रकारे सौदाच केला.

नाशिक : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नाशकातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात जात पंचायतीच्या जाचाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा गुन्हा दाखल करु नये, म्हणून जात पंचायातीने कुटुंबावर दबाव टाकत वाळीत टाकलं. आरोपीने पीडित तरुणीबरोबर लग्न करण्याबाबत दिलेलं लेखी आश्वासन पाळण्यास नकार दिल्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. आपण आज जागतिक महिला दिन साजरा करत आहोत, मात्र त्याच दिवशी समाजाचा दुसरा चेहरा दाखवणारी घटना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधल्या राजेवाडी गावात घडली. 23 जानेवारी 2018 रोजी राजेवाडी गावातील दिनकर शिवा येले या 19 वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर गुन्ह्याची वाच्यता करु नये, म्हणून तरुणीच्या कुटुंबीयांना धमकवण्यात आलं. त्यांना जमिनीचं आमिष दाखवण्यात आलं. विशेष म्हणजे आरोपीने बलात्काराचा गुन्हा केल्याचं बाँड पेपरवर कबूल करत आपल्या कृत्याचा एक प्रकारे सौदाच केला. अल्पवयीन तरुणी ज्यावेळी सज्ञान होईल, त्यावेळी तिच्याशी विवाह करण्याचं त्याने लेखी दिलं. विवाह न केल्यास तिच्या नावावर पाच एकर जमीन देण्याचं हमीपत्रही त्याने नोटरी करुन पंचांसमक्ष लिहून दिलं. या घटनेला दीड महिना झाल्यावर आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेला दिलेलं आश्वासन तोडलं. ज्या पेपरवर लेखी दिलं, ते पेपर फाडून टाकण्याची जबरदस्ती केली. ज्यावेळी मुलीच्या वडिलांनी पेपर फाडण्यास नकार दिला, तेव्हा जात पंचायतीने वाळीत टाकलं, असा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला. पीडित मुलीचं कुटुंबीय ठाकूर समाजाचं आहे. त्यांना लग्नकार्यातही येऊ दिलं जात नाही. त्यांच्याशी कोणी संबंधही ठेवत नसल्याचं वास्तव उघडकीस आलं. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र जात पंचायतीला मोकळं सोडण्यात आलं आहे. त्यामुळे जात पंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. त्यामुळे तपासात जे जे पुढे येईल त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. एकीकडे महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागणे, एखाद्या मुलीवरील अत्याचाराचा बाँड पेपरवर सौदा करणे, त्याला पंचांची साथ मिळणे आणि या विरोधात आवाज उठवणाऱ्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करणे, हे सारंच धक्कादायक आहे. त्यामुळे पीडित मुलीला कसा न्याय मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget