एक्स्प्लोर
Advertisement
पाच तरुण, सहा अर्धनग्न बारबाला, रंगेहाथ पकडूनही जामीन का?
नाशिक : पोलिसांनी रविवारी मध्यरात्री इगतपुरीमधल्या मॅस्टिक व्हॅली रिसॉर्टच्या बंगला क्रमांक 11 वर छापा मारला आणि त्यांच्या नजरेस पडलेलं दृश्य बिभत्स होतं. पोलिसांना पाहून मद्यधुंद अवस्थेतील मुलांची नशा एका झटक्यात उतरली. तर तिथं उपस्थित असलेल्या अर्धनग्न बारबालांनी बाथरूमकडे धाव घेतली.
या बॅचलर पार्टीवरच्या छाप्याची खबर मिस्टिक व्हॅलीबाहेर गेली आणि कारवाई करणाऱ्या पोलिसांचे फोन खणाणू लागले. कारण या बॅचलर पार्टीमध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या मुलांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.
बॅचलर पार्टीसाठी बोलवाण्यात आलेल्या बारबालेसाठी प्रत्येकी 1 लाख रुपये मोजण्यात आल्याचं समजतं. तसंच त्यांचं ऑनलाईन बुकिंग करण्यात आलं होतं.
स्थानिकांच्या तक्रारीनंतर केलेल्या कारवाईत पोलिसांनी 5 तरुण, 6 बारबाला आणि आणि 2 डीजेंना अटक केली. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि दारु रिचवली गेल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र कारवाईनंतर अवघ्या काही तासातच अटक करण्यात आलेल्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
लहानसहान कारवाईची प्रसारमाध्यमांना खबर देणाऱ्या पोलिसांनी, या प्रकरणाबाबत गुप्तता का बाळगली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. बॅचलर पार्टीतले तरुण बड्या बापाची धेंड असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही का, असा प्रश्न नाशिककरांना सतावत आहे. आणि तसं झालं तर नाशिक पोलिसांवरच्या विश्वासर्हतेवर शंका उपस्थित केल्यास वावगं ठरु नये.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement