नाशिकमध्ये सावत्र आईकडून कौर्याची परिसीमा, लहानग्याच्या गुप्तांगाला चटके दिले
नाशिकमध्ये घरगुती कारणातून रागाच्या भरात सावत्र आईने लहानग्याचा अमानुष छळ केला. मुलाच्या गुप्तांगाला रबर बांधून चटके दिले. सावत्र आईविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : एका सावत्र आईने कौर्याची परिसीमा गाठल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाला रबर बांधून चटके दिले. वडील कामावर गेल्यानंतर आईने या अल्पवयीन मुलाचा छळ केला. या प्रकरणी सावत्र आईविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे गावातील ही घटना आहे. घरगुती कारणातून रागाच्या भरात सावत्र आईने लहानग्याचा अमानुष छळ केला. या महिलेने मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले. दरम्यान या घटनेत मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर बालकाचं शोषण केल्याप्रकरणी आईविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सावत्र आईची बाजू
या घटनेनंतर सावत्र आईच मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला चटके दिल्याचा आरोप तिने फेटाळला आहे. हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झालं त्यातून ही घटना घडली आहे, असं दावा तिने एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
सावत्र आई ही मुलाची सख्खी मावशी
महत्त्वाचं म्हणजे मुलाची सावत्र आई ही त्याची मावशीच आहे. पत्नीच्या पश्चात मुलांचा चांगला सांभाळ व्हावा यासाठी वडिलांनी त्या मुलांच्या मावशीसोबतच लग्न केलं. परंतु मावशीनेच मुलावर अमानुष अत्याचार केला. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
