एक्स्प्लोर
Advertisement
पिस्तुल दाखवताना गोळी सुटल्याने मामेभावाचा मृत्यू
काकासाहेब धाडबळे यांचा मुलगा म्हणजेच बाजीराव यांचा आतेभाऊ राहुल कुतूहलापोटी वडिलांची पिस्तुल बाजीराव यांना दाखवत होता. मात्र ती पिस्तूल लोड होऊन त्यातून गोळी सुटली.
मालेगाव : लष्करी सेवेत असलेल्या वडिलांची पिस्तुल मामेभावाला दाखवण्यासाठी तरुणाने हातात घेतली. मात्र
पिस्तुलातून नकळत गोळी सुटल्याने मामेभावाच्या छातीत गोळी घुसून त्याचा मृत्यू झाला. नाशिक जिल्हयातील नांदगावच्या ढेकू गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
बाजीराव म्हस्के हे आपल्या पत्नीसह शनिवारी काकासाहेब धाडबळे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. काकासाहेब धाडबळे यांचा मुलगा म्हणजेच बाजीराव यांचा आतेभाऊ राहुल कुतूहलापोटी वडिलांची पिस्तुल बाजीराव यांना दाखवत होता. मात्र ती पिस्तूल लोड होऊन त्यातून गोळी सुटल्याने तिथेच उभे असलेल्या बाजीरावच्या छातीत गोळी लागली.
बाजीराव यांना तातडीने मालेगावमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. बाजीराव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नांदगाव पोलिसात राहुल धाडबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून रात्री उशिरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement