एक्स्प्लोर
तीन विषयात नापास झाल्याने नाशकात विद्यार्थिनीची आत्महत्या
राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन 18 वर्षीय मयुरी सोनावणेने आयुष्य संपवलं.

नाशिक : नाशकात 18 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन विषयात नापास झाल्यामुळे मयुरी सोनावणेने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे. मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मयुरीने आत्महत्या केली. सिडकोतील कालिका पार्क परिसरात राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आयुष्य संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरी ही नाशकातील मराठा कॉलेजमध्ये कला शाखेच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेत होती. तीन विषयात नापास झाल्यामुळे ती निराश होती. सोबत शिकणाऱ्या मैत्रिणी शिक्षण घेत पुढे जात असल्यामुळे तिने जीव दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा























