एक्स्प्लोर
मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक विस्कळीत, कसारा घाटात एक्सप्रेसचा डबा रुळावरुन घसरला
ऐनगर्दीच्या वेळी नाशिकहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे मात्र मोठे हाल होताहेत.
नाशिक : मध्य रेल्वेवरील मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा घाटात काशी एक्सप्रेसचा डबा रुळावरुन घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. स्टेशन काही मिनिटे दूर असताना मध्यरात्रीची ही घटना घडली आहे. प्रवासी झोपेत आतानाच शेवटच्या डबा घसरला. सुदैवाने यात कोणतीही हानी नाही.
रात्री घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचं काम रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे नाशिक, इगतपुरीकडे जाणारा रेल्वेमार्ग सध्या पूर्णपणे बंद आहे. ऐनगर्दीच्या वेळी
नाशिकहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे मात्र मोठे हाल होताहेत.मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. कारण हा अपघात कसारा - इगतपुरी दरम्यान झाला आहे. मात्र, मुंबईहुन नाशिक कडे जाणाऱ्या एकसप्रेस गाड्यांचा खोळंबा झाला असला तरी अप आणि मिडल लाईनवरुन एक्स्प्रेसची पर्यायी वाहतूक सुरु आहे, मात्र, मुंबई-नाशिक रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement