एक्स्प्लोर
बांधकाम मजुराच्या पोटात घुसलेली सळी काढून जीवदान
नाशकातील लासलगावात 8 मार्चला बांधकाम सुरु असताना सलीम शेख पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळला. त्यामुळे एक सळी थेट त्याच्या पोटात घुसून खांद्यातून बाहेर आली.

मुंबई : नाशिकमधील बांधकाम मजुराच्या पोटात घुसलेल्या सळ्या बाहेर काढण्यात मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आलं आहे. पाच तासांच्या ऑपरेशननंतर सलीम शेखला जीवदान मिळालं. नाशकातील लासलगावात 8 मार्चला बांधकाम सुरु असताना सलीम शेख पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळला. त्यामुळे एक सळी थेट त्याच्या पोटात घुसून खांद्यातून बाहेर आली. 4 फूट लांब आणि 8 मिलीमीटर जाडीची ही सळी सलीमच्या शरीरात घुसून होती. मजुरांनी ती सळी कापून सलीमला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. सलीमचं आतडं, यकृत, फुफ्फुस आणि मानेला सळीने अक्षरशः चिरलं होतं. त्यानंतर सलीमला तातडीने मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. तब्बल वीस तास ही सळी सलीमच्या शरीरात होती. डॉक्टरांसाठी हे एक आव्हानच होतं. या कालावधीत सलीम बेशुद्धावस्थेत होता. अखेर पाच डॉक्टरांच्या टीमने प्रयत्नांची शर्थ करत पाच तासांच्या ऑपरेशननंतर सलीमच्या शरीरातून ही सळी बाहेर काढली. सलीमची प्रकृती सध्या ठीक आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
राजकारण























