एक्स्प्लोर
मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला लाखोंचा गंडा, नायजेरियन तरुण अटकेत
मॅट्रिमॉनिअल वेबसाईट्सवरुन लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणीला 1 लाख 67 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. जीवनसाथी डॉट कॉमच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. पीडित तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केली असून, एका आरोपीला पोलिसांनी नोएडातून अटक केली आहे.
नाशिक : मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवरुन लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणीला 1 लाख 67 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. जीवनसाथी डॉट कॉमच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. पीडित तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केली असून, एका आरोपीला पोलिसांनी नोएडातून अटक केली आहे.
मॅट्रिमोनिअल साईट्सच्या माध्यमातून मुलींची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच नाशिकच्या ओझर पोलिस स्टेशनला 19 जुलै 2017 रोजी जीवनसाथी डॉट कॉमच्या माध्यमातून लग्नाच आमिष दाखवून 1 लाख 67 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची एका तरुणीने तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांनी नोएडामधून फसवणूक करणाऱ्या किंग्सले इथियॉक चिबुकेम या मूळच्या नायजेरियन तरुणाला अटक केली आहे. किंग्सलेच्या चौकशी दरम्यान त्याने विविध राज्यातील अनेक मुलींना अशाचप्रकारे अमिष दाखवून फसवणूक केल्याचे तपासात समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित तरुणीनं जीवनसाथी डॉट कॉम नावाच्या साईटवर लग्नासाठी तिची प्रोफाईल अपलोड केली होती, आरोपीने मुलीला मायकल नावाने लग्नासाठी रिक्वेस्ट सेंड करत तिच्या सोबत आपले संबंध वाढवले होते आणि चॅटिंग करत असतांनाच मी लंडनला राहत असून कुरिअरच्या माध्यमातून गिफ्ट पाठवायच आहे. त्यासाठी तुझा बँक अकाउंट नंबर दे असे सांगून मुलीचा विश्वास संपादन केला. कुरियरच्या खर्चापोटी तिच्या अकाऊंटमधून 1 लाख 67 हजार रुपये भरून घेतले. मात्र गिफ्ट येत नसल्याने तसेच वेळोवेळी पैशांची मागणी होत असल्याने मुलीला शंका येत आपली फसवणूक झाल्याच लक्षात येताच मुलीने ओझर पोलिस स्टेशनला धाव घेत गुन्हा दाखल केला होता,
पोलिसांनी संबंधित बँकेकडून माहिती गोळा करून सायबर सेलच्या माध्यमातून तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement