एक्स्प्लोर
नाशिक पोलिसांकडून माणुसकीचं दर्शन

नाशिक: नाशिकच्या पोलिसांनी आज माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. गैरसमजापोटी आपल्या नवजात अर्भकाला रुग्णालयातच सोडून गेलेल्या मातेला तिच्या बाळाची पुन्हा भेट घडवण्याचे काम आज पोलिसांनी केले. पालघरच्या मोखाडामधील एक आदिवासी गर्भवती महिला नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल होती. तिची प्रसुती होताच बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होत. मात्र, आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा गैरसमज होऊन ती महिला मोखाड्याला निघून गेली. डॉक्टरांनी हा प्रकार पोलिसांना कळवताच पोलिसांनी मोखाड्याला एक पथक रवाना केले. या पथकाने दिवसभर त्या महिलेचा शोध घेतला. दिवसभराच्या शोधानंतर त्या महिलेला पुन्हा नाशिकमध्ये आणून ते बाळ तिच्या स्वाधीन केले. नाशिक पोलिसांच्या या कामाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
आणखी वाचा























