एक्स्प्लोर

'नितीन, भारत माता की जय म्हणणारे..' आईच्या सलामीने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी, शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले नितीन भालेराव आज अनंतात विलीन झाले.लहान भाऊ सुयोग भालेरावने शहीद नितीन भालेराव यांना मुखाग्नी दिला.

नाशिक : शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन झाले आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात भालेराव यांना वीरमरण आले होते. डोळ्यात पाणी आणि नितीनला सलामी देत 'नितीन भारत माता की जय म्हणणारे' अशी हाक नितीन यांच्या आईने देताच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. नितीन यांची चिमुकली वेदांगी हिने देखील आपल्या वडिलांना सलामी देताच स्मशानभूमीत यावेळी एकच शांतता पसरली होती. लहान भाऊ सुयोग भालेरावने शहीद नितिन भालेराव यांना मुखाग्नी दिला.

आज दुपारी रायपूरहून त्यांचे पार्थिव ओझर विमानतळावर आणण्यात आले होते. त्यांनतर नाशिक शहरातील राजीवनगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी पार्थिव आणण्यात आले होते. भालेराव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. राजीवनगरपासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होऊन साईनगर चौफुली, द्वारका मार्गे अमरधामला पार्थिव नेण्यात आले. राज्य राखीव दलाच्या जवानांकडून त्यांना सलामी देण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, राज्य राखीव दलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्तांसह ईतर शासकीय अधिकारी आणि भालेराव कुटुंबाकडून नितीन यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

नितीन भालेराव हे कोबरा बटालीयन 206 चे अधिकारी होते. कोबरा बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियानावर गेले होते, शनिवारी रात्री परतत असतानाच साडे आठच्या सुमारास बुर्कापाल कॅपच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या अॅम्बुशमध्ये जवान फसले. यावेळी माओवाद्यांनी तिथे IED ब्लास्ट घडवून आणला. या स्फोटात 9 जवान जखमी झाले असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याच बोलल जातंय, जखमी जवानांना उपचारासाठी रायपूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. यात सहाय्यक कमांडट नितिन भालेराव यांचा मृत्यू झाला.

भालेराव यांचं मुळ गाव निफाड तालुक्यातील देवपूर हे असून नोकरीनिमित्त काही वर्षापूर्वी नाशिक येथे कुटुंब स्थायिक झालेले होते, नितिनचे वडील पुरुषोत्तम भालेराव हे नाशिक येथे इंडिया सिक्यूरिटी प्रेसला कामगार होते, वीस वर्षापुर्वीच त्यांच निधन झाल होत. नाशिक शहराच्या राजीव नगर परिसरातिल श्रीजी सृष्टी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासमवेत ते राहत होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, आई आणि 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. नितिन यांचे मोठे बंधू अमोल भालेराव हे नाशिकच्या नोट प्रेसमध्ये काम करतात तर लहान भाऊ सुयोग हे एका महाविद्यालयात शिक्षक आहेत. नितिन यांच्या अशा अचानक जाण्याने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

नितीनने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीत पुर्ण केले होते. त्यानंतर युपीएससी मार्फत झालेल्या परिक्षेत नितिन भालेराव हे 2013 मध्ये असिस्टंट कमांडर म्हणून सेवेत दाखल झाले होते. डेहराडुन येथे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर गांधीनगर, काश्मीर, पेहलगाम, दिल्ली लोकसभा गेट नं 2, पंतप्रधान कार्यालय सुरक्षा, पंतप्रधान निवासस्थान या ठिकाणी त्यांनी सेवा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रथम शपथविधीच्या सुरक्षा पथकातही नितिन यांनी सेवा केली होती. त्यानंतर मथुरा व नुकतीच त्याची रायपूर येथे नेमणुक झाली होती. जून महिन्यात नाशिकला ते आले होते आणि तिच कुटुंबीयांसोबत झालेली त्याची भेट अखेरची ठरली. पुढील दोन दिवसात ते पुन्हा नाशिकला सुट्टीनिमित्त येणार होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget