एक्स्प्लोर
10 रुपयाचं नाणं गिळल्याने साडेचार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
दहा रुपयाचं नाणं गिळल्यानं साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदगिरी गावात घडली आहे.

नाशिक : दहा रुपयाचं नाणं गिळल्यानं साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदगिरी गावात घडली आहे. शालिनी हांडगे असं मयत मुलीचं नावं असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसेजवळील चांदगिरी गावात राहणाऱ्या शालिनीने काल (रविवार) दुपारी खेळता खळता दहा रुपयाचं नाणं गिळलं होतं. त्यानंतर शालिनी झोपी गेली. मात्र, अचानक त्रास होऊ लागल्याने तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिने नाणं गिळल्याचं समोर आलं. शालिनीवर रुग्णालयात उपचारही सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. पण उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनं हांडगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























