एक्स्प्लोर

खडसेंसाठी भाजप म्हणजे 'जीना यहाँ मरना यहाँ' : मुनगंटीवार

डसेंसाठी भाजप म्हणजे जीना यहाँ, मरना यहाँ असं आहे. पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ खडसेंनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत, असं मुनगंटीवार म्हणाले.

नाशिक:  एकनाथ खडसे भारतीय जनता पक्ष कधीच सोडणार नाहीत, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. खडसेंसाठी भाजप म्हणजे जीना यहाँ, मरना यहाँ असं आहे. पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ खडसेंनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत, असं मुनगंटीवार म्हणाले. देशाचे पंतप्रधान जर ओबीसी आहेत तर खडसे यांच्यावर अन्याय कसा ?  एकनाथ खडसे यांच्या नाराजी संदर्भात मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी भाजप म्हणजे 'जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा' असं आहे, असं मुनगंटीवारांनी नमूद केलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काल वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल आले होते. दुपारी त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी नाराज खडसेंसोबत चर्चा करणार असल्याचं सांगत भुजबळ यांनी माझा कट्टयावर केलेल्या बाळासाहेबांच्या अटकेच्या फाईलवरील सहीच्या वक्तव्याचाही खरपूस सामाचार घेतला. बाळासाहेबांच्या फाईलवर सही करताना भुजबळांनी विचार करायचा होता : मुनगंटीवार  युतीच्या काळात अशी कोणतीही फाईल तयार झालेली असेल, एखाद्या विभागाने फाईल तयार केलेली असेल, तर कोणत्याही फाईलवर सही करतांना भुजबळ यांनी आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करून सही करायला हवी होती. युतीच्या काळात अशी फाईल तयार झालेलीच नसेल. कोणत्याही मंत्र्याला आपण डोळे झाकून सही केली असं म्हणण्याचा अधिकार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. भुजबळ काय म्हणाले होते? दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या आदेशाची फाईल आपल्या कार्यकाळात नव्हे, तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात तयार झाली होती, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर केला. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर आपण केवळ सही केल्याचं भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं. छगन भुजबळ यांनी या विधानाद्वारे बाळासाहेबांची अटक ही युती सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या फाईलमुळे झाल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं. संबंधित बातम्या  बाळासाहेबांच्या अटकेची फाईल माझ्या अगोदरच तयार झाली होती : भुजबळ 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget