एक्स्प्लोर
नाशिकला पाणी पुरवणाऱ्या टाकीत 5 दिवसांपासून मृतदेह
पंचवटी पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

नाशिक : नाशिककरांची झोप उडवणारी बातमी आहे. कारण नाशकातल्या शेकडो घरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत पाच दिवसांपासून मृतदेह पडला होता. पंचवटी पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
दशरथ बाळू ठमके असं पाण्याच्या टाकीत सापडलेल्या मृत इसमाचं नाव आहे. दशरथ 21 तारखेपासून बेपत्ता होता. दशरथचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते त्या महिलेच्या पतीने तीन साथीदारांच्या मदतीने दशरथची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी मारेकऱ्यांनी डाळींब मार्केटमधल्या पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवला.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपींना अटक केली. मात्र आरोपींच्या या कृत्यामुळे नाशिककरांना मृतदेह पडलेल्या टाकीतलं पाणी प्यावं लागलं. त्यामुळे नाशिकमध्ये या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
पाहा बातमीचा व्हिडिओ :
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















