एक्स्प्लोर

संभाजी भिडेंविरुद्ध 'त्या' वादग्रस्त वक्तव्याबाबत न्यायालयात तक्रार दाखल

आंब्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर नाशिक न्यायालयात फिर्याद दाखल झाली आहे.

नाशिक : आंब्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर नाशिक न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. पीसीपीएनडीटी समितीनं भिडे यांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून भिडे यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेच्या प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीच्या चौकशीत भिडे दोषी आढळले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने समिती स्थापन करुन, संबंधित प्रकरणाची चौकशी केली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने संभाजी भिडेंना या प्रकरणात नोटीसही पाठवली होती. मात्र भिडेंनी नाशिक महापालिकेने पाठवेलली नोटीस स्वीकारली नव्हती. त्यावेळीच संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार हे निश्चित झालं होतं.

काय होतं संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य?

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं.

भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला.

संभाजी भिडे म्हणाले की, "भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: तुम्ही पाप करताय म्हणणारा अशोक खरात कोठडीत रडतोय; पहिल्या आठवड्यात आत्मविश्वास दाखवला पण आता फासे उलटे पडताच...
तुम्ही पाप करताय म्हणणारा अशोक खरात कोठडीत रडतोय; पहिल्या आठवड्यात आत्मविश्वास दाखवला पण आता फासे उलटे पडताच...
Ashok Kharat : अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
Ashok Kharat: एका तरुण मुलीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांना भीती दाखवून लुटलं; अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत धक्कादायक माहिती
एका तरुण मुलीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांना भीती दाखवून लुटलं; अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत धक्कादायक माहिती
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट
भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Donald Trump : इराणसोबत शस्त्रसंधी केली पण ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
ट्रम्प थांबण्याचं नाव घेईनात, इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांना इशारा, थेट 50 टक्के टॅरिफची धमकी
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी संतोष देशमुखांच्या पत्नी उद्या अर्ज भरणार; निवडणूक होणार की बिनविरोध?
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर
Embed widget